शिक्षकच विद्यार्थ्यांना दिशा दाखवतात – आमदार श्री देवराव भाऊ भोंगळे” /०/ छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ‘शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा

शिक्षकच विद्यार्थ्यांना दिशा दाखवतात – आमदार श्री देवराव भाऊ भोंगळे”

छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ‘शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा

“शिक्षक हे केवळ शैक्षणिक ज्ञानाचे प्रसारक नसून, ते विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणारे प्रेरणादायी मार्गदर्शक असल्याचे मत माजी विद्यार्थी तथा राजुरा विधानसभेचे आमदार श्री देवराव भाऊ भोंगळे यांनी व्यक्त केले.

छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ‘शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर, पर्यवेक्षक निबांळकर सर, चंद्रपूरचे प्रसिद्ध विधीज्ञ व माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री आशीष धर्मपुरीवार मंचावर उपस्थित होते.

श्री भोंगळे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील गमतीदार आठवणी सांगितल्या व शिक्षकांचे प्रेरणादायी योगदान उजळून दाखवले. “शिक्षक हे केवळ शैक्षणिक ज्ञानाचे प्रसारक नसून, ते विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणारे प्रेरणादायी मार्गदर्शक आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी भविष्य घडवतात. मोठे स्वप्न बघा, ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी कठोर परिश्रम करा. शिक्षक तुमच्या मार्गदर्शक आहेत, त्यांचे आदर करा.” शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडते, असेही ते म्हणाले.विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने मोठे स्वप्न बघण्याचा आणि ध्येय निश्चित करून परिश्रमाने त्याच्या पाठलागाचा संदेश दिला. यावेळी त्यांनी दिला.

यावेळी शाळेतील प्रत्येक शिक्षकांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला, जे त्यांच्या अथक परिश्रमांचे सन्मान व आदर व्यक्त करणारे क्षण ठरले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांत मॅडम यांनी अध्यक्षीय मार्गदशषन केले. याच कार्यक्रमात आमदार श्री देवराव भोंगळे यांचा छोटूभाई पटेल हायस्कूल तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक प्रतिनिधी सौ. कुंमरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी संघाचे सदस्य डॉ. पराग जवळे यांनी सुद्धा एक कविता सादर केली.कार्यक्रमाचे प्रेरणादायी प्रास्ताविक चंद्रपूरचे प्रसिद्ध विधीज्ञ आणि छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री आशीष धर्मपुरीवार यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन श्री चंद्रकांत कोतपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर कुंदोजवार यांनी केले. यावेळी छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे या कार्यक्रमात आशिष धर्मपुरीवार, परविन पठाण, पराग जवळे, विकास खाडिलकर, जितेंद्र मशारकर, श्याम कोंतमवार, लक्ष्मीकांत कोराटे, संतोष येडलावार, प्रफुल्ल देमेवार, धीरज साळुंके, चंद्रकांत कोतपल्लीवार, सागर कुंदोजवार आदींची उपस्थिती होती. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि शालेय कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात विशेष लक्षवेधी ठरले धीरज साळुंके यांचे पत्रलेखन. छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे धीरज साळुंके यांनी दिवंगत पठाण सर यांना आदरांजली व्यक्त करणारे मनस्पर्शी पत्र वाचन केले, ज्यामुळे उपस्थितांच्या मनात गुरुजनांच्या आठवणींची जिवंत झलक उमटली. तसेच, विद्यमान शिक्षक श्री बारापात्रे सर यांच्यावर लिहिलेल्या पत्राद्वारे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले गेले. डिसेंबर 2025 होणार भव्य ‘माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा’, पुढील महत्त्वाकांक्षी आयोजन म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये नियोजित ‘माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा’, जिथे शालेय आठवणी उजळवणारे सांस्कृतिक सादरीकरण, छायाचित्र प्रदर्शनी, प्रेरणादायी संवादपर सत्रे व सत्कार सोहळा यांचा समावेश राहणार आहे.