वंचित बहुजन महीला आघाडी च्या वतीने उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत रस्ते वाहतूक मंत्री व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन
बोढेगाव येथील रेती घाटामुळे ब्रम्हपुरी-आरमोरी या महामार्गाला अडथळा निर्माण…
बातमी – मंगेश बनसोड
बोढेगाव येथे रेती घाट सुरू असल्यामुळे तेथील रेती नेणारे ट्रक थेट कोतवाल पाट (निलगिरी बार) बेटाळा-आरमोरी मेन रोड मुख्य महामार्गावर उभे राहात आहेत. त्यामुळे सदर रस्ता सध्या एकपदरी झाला असून मोठी वाहने तसेच दुहेरी वाहतूक सुरळीत चालत नसल्याने गडचिरोली,गांगलवाडी, रूई,निलज,किन्ही या मार्गावरील प्रवाशांना,शेतकर्यांना,रुग्णवाहिका सेवा,तसेच शालेय वाहनांनाही अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांना एका मागे एक अशा पद्धतीने वाहतूक करावी लागत आहे.ज्यामुळे अपघात होण्याचा धोका देखील वाढत आहे.सदर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्या रेती वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणावे,ट्रक उभे करण्यास बंदी घालावी व नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी.अशी मागणी वंचित बहुजन महीला आघाडी करीत आहे
समस्या मार्उगी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा लिनाताई रामटेके जिल्हा उपाध्यक्षा यांनी दिला आहे.
गणेश शेंडे,गंगाधर ढोरे, लता मेश्राम,चंदा माटे, विद्या बागडे,सुकेशनी चौधरी,सारीका खोब्रागडे,अनुपमा जनबंधू,विजया खोब्रागडे, शिला नीहाटे, निरू खोब्रागडे व इतर कार्यकर्त्ये उपस्थित होते.