श्री उज्वलज्योत गणेश मंडळ सिंदेवाही तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री उज्वलज्योत गणेश मंडळ सिंदेवाही तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री उज्वलज्योत बहुउद्देशीय संस्था गेल्या 25 वर्षापासून सिंदेवाही शहरात वर्षभर विविध समजपयोगी काम करते त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबीर , वृक्षारोपण, गोरगरीब अनाथाना मदत करणे हे कार्यक्रम राबवील्या जातात त्याचाच एक भाग म्हणजे म्हसकऱ्या गणेशोत्सव साजरा केला जातो त्यानिमित्याने सुद्धा मंडळाच्या वतीने फक्त उत्सव न ठेवता विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये दिनांक 14 सप्टेंबर रविवारला सकाळी 6.00 वा. मॅराथँन स्पर्धा दुपारी 12 वा. सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच मंगळवार रोज 16 सप्टेंबर सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे , मॅराथँन स्पर्धा तसेच सायकल स्पर्धा ही खुला गट आणि 14 वर्षाखालील गट अशा दोन गटात घेतली जाणार आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गणेश मंडळाचे अध्यक्ष संजय भरडकर उपाध्यक्ष विलास शेंडे सचिव श्याम गांडईत सहसचिव नेताजी हरणे कोषाध्यक्ष नितीन मगरे तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे