मिनाक्षी नागदेवते आचार्य पदवीने सन्मानित

मिनाक्षी नागदेवते आचार्य पदवीने सन्मानित

सिंदेवाही :- भारतीय बौद्ध महासभा सिंदेवाही तालुका संघटक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाजी नागदेवते यांची मुलगी मिनाक्षी दादाजी नागदेवते हिने पीएचडी ही पदवी मिळविली असून नुकताच गोंडवाना विद्यापीठाने तिला आचार्य पदवीने सन्मानित केले आहे.

शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असलेली पीएचडी ही पदवी एखाद्या विशिष्ट विषयात केलेल्या मूळ संशोधनाच्या अभ्यासानंतर दिली जाते. सिंदेवाही येथील रहिवासी मिनाक्षी नागदेवते हिने ” होम इकॉनॉमिक ” या विषयात पीएचडी केलेली असून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी गोंड जमातीतील स्वास्थ संवर्धनात्मक दृष्टिकोनातून उपयोगात येणारे अन्न पदार्थ आणि वन औषधी यांचे विश्लेषणात्मक अध्ययन या विषयावरील प्रबंध लिहून त्यांनी विद्यापीठाला सादर केला. यासाठी पर्यवेक्षक म्हणून कला, वाणिज्य महाविद्यालय तळोधी ( बाळापूर) येथील प्राध्यापक डॉ. एम.एन. कोकोडे यांनी काम पाहिले आहे. तालुक्यातून मिनाक्षी हिने डॉक्टरेट पदवी मिळविली असल्याने भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे, सरचिटणीस लोमेश खोब्रागडे, सिंदेवाही तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, सरचिटणीस जगदीश सेमस्कर , कोषाध्यक्ष भैयाजी निमगडे, संघटक महेंद्र कोवले, बलदेव चहांदे, भैयाजी मानकर, सिद्धार्थ रंगारी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शुभांगी खोब्रागडे, सचिव प्राजक्ता खोब्रागडे, रजनी चुनारकर, संगीता खोब्रागडे, पौर्णिमा डांगे, दर्शना खोब्रागडे, तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पदाधिकारी, सिंदेवाही तालुका येथील सर्व पदाधिकारी कडून अभिनंदन करण्यात येत आहे.