सिंदेवाही चे प्रतिक हरणे यांची सेट परीक्षेत भरारी
येथील प्रतीक पुष्पा प्रेमकुमार हरणे यांनी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय पात्रता (SET) परीक्षा उत्तीर्ण करून सिंदेवाही शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्रात गोवा राज्यस्तरीय ४०वी पात्रता (सेट) परीक्षा सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या वतीने १५ जुन रोजी घेण्यात आली होती. याचा निकाल नुकताच ३० ऑगस्ट ला घोषित झाला असुन यात सिंदेवाहिच्या प्रतिक हरणे यांनी लाइफ सायन्स या विषयात प्रविण्यासह उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या प्रविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल अनेकांनी प्रतिक यांचेवर पुष्पगुच्छ व गुलाल उधळत प्रतीक यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या समोरील वाटचालीच शुभेच्छा दिल्या आहेत.
हे क्षण परीवार व मित्र परिवाराला खुशीचे तसेच भावनिक होते. आई-वडील, भाऊ-वहिनी, मामा-मामी, गुरुजन तसेच मित्र-मैत्रीणी आदींची साथ मिळाल्याने हे शक्य झाले असल्याचे प्रतीक पुष्पा प्रेमकुमार हरणे यांनी भावनिक होत सांगितले.