श्री गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे तरतुदीनूसार जिल्हयात एकुण ५४० इसमांविरुध्द संबंधीत पोस्टे हद्दीत येण्यास मनाई (हदद्घार) कारवाई

श्री गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे तरतुदीनूसार जिल्हयात एकुण ५४० इसमांविरुध्द संबंधीत पोस्टे हद्दीत येण्यास मनाई (हदद्घार) कारवाई

भारताची राज्यघटना आम्हांस सर्वधर्म, समभाव, धर्मनिरपेक्षता अशी शिकवण देते, मात्र काही समाज विघातक प्रवृत्ती या मुळ संकल्पनेलाच मोडीत काढुन देशात अराजकता पसरविण्यात सतत प्रयत्नशील असतात. अशा प्रवृत्तीला आळा घालुन आपली परंपरा, सण-उत्सव उत्साहाने साजरे करणे व त्याचवेळी शांतता, सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे फार महत्वाचे असल्याने श्री गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील शांतता व सामाजिक सलोखा कायम रहावा आणि कायदा व सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नेतृत्वात जिल्हयातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी आप-आपले पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता भंग करणारे एकुण ५४० इसमाविरुध्द कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ अन्वये संबंधीत पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाईचा हूकूम व्हावा म्हणुन प्रस्ताव तयार करुन संबंधीत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवुन एकुण ५४० इसमांविरुध्द त्यांच्या पोस्टे हद्दीत येण्यास मनाई (हद्दपार) चा आदेश पारीत करुन घेण्यात आला आहे.