जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपाधारक उमेदवारांचा मेळावा
चंद्रपूर, दि. 3 : अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारीत धोरणानुसार मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत अनुकंपा उमेदवारांचा मेळावा नियोजन भवन येथे आज (दि.3) पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक नरेशकुमार बहिरम उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना डॉ. व्यवहारे म्हणाले, शासकीय नोकरीदरम्यान मृत्यु झालेल्या अधिकारी कर्मचा-यांच्या वारसदारांना नोकरीत समाविष्ठ करण्याचे शासनाचे धोरण आहे. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपाधारकांचा मेळावा घेऊन त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश राज्य शासनाकडून आले. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार व पात्रतेनुसार आपली नियुक्ती होणार आहे. आपल्या पालकांनी शासकीय सेवा केली, याची जाणीव ठेवून आपल्याला सुध्दा चांगल्या पध्दतीने शासकीय सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची आहे, असे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात अनुकंपाधारकांसाठी विविध आस्थापनांच्या एकूण 88 रिक्त जागा आहे. जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील असे एकूण 127 अनुकंपाधारक असून आजच्या मेळाव्याला 105 उमेदवार उपस्थित होते. त्यांच्याकडून पसंतीक्रम मागवून त्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली असून प्रत्यक्ष नियुक्ती 15 सप्टेंबर पर्यंत मिळणार असल्याचे अधिक्षक नरेशकुमार बहिरम यांनी सांगितले.