शंघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता नोंदणी करण्याचे आवाहन

शंघाई येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 2 : जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मध्ये शंघाई येथे होणार आहे. यात सहभाग नोंदवण्यासाठी जिल्हा विभाग, राज्य आणि देश पातळीवरून स्पर्धा घेतली जाणार असून त्यात कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी विविध 63 क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.skillindiadigital.gov.in यावर नोंदणी करावी.

 

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 50 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असावा. या स्पर्धेसाठी सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, एमएसएमई टुल रुम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयएचएम हॉस्पिटेलिटी इन्स्टिटयूट, कॉर्पोरेट टेक्नीकल इन्स्टिट्युट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्युट, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीइटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, फाईन आर्टस महाविद्यालये, फ्लावर ट्रेनिंग इन्स्टिटयूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकींग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यवसायिक आस्थापना आणि कारखाने यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छुक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल.

तरी सदर कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून 30 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. ल. तडवी यांनी केले आहे.