ट्रक्टर मध्ये अवैधरित्या रेती चोरी करणारे विरुध्द गुन्हा दाखल अवैध रेती व वाहनासह एकुण ४,०५,०००/- रु.चा माल जप्त
पोलीस स्टेशन भद्रावती ची कारवाई …
दिनांक ३० ऑगस्ट, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे भद्रावती पोलीसांनी सापळा रचुन मानोरा फाटा येथे नाकाबंदी केली असता प्राप्त माहितीनूसार एक ट्रॅक्टर मांगली रोडवरुन भद्रावती कडे येतांना दिसल्याने त्यास थांबवून पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता सदर ट्रॅक्टर/ट्रॉली मध्ये अंदाजे १ ब्रास रेती अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने ट्रॅक्टर वरील आरोपी (१) राजु पुरुषोत्तम शिरपूरकर वय ३९ वर्ष (२) अक्षय अशोक बोढेकर वय २८ वर्ष दोन्ही रा. मांगली यांचेविरुध्द पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक ५०७/२०२५ कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता-२०२५ सहकलम ४८ महाराष्ट्र जमीन महसुल अधि. १९६६ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीतांना अटक करण्यात आली असुन त्यांच्या ताब्यातील एक महिंद्र ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२९-व्हि-१७१३ व ट्रॉली आणि त्यातील १ ब्रास रेती असा एकुण ४,०५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री योगेश्वर पारधी यांचे नेतृत्वात मपोउपनि प्रियंका गेडाम, पोअं जगदीश झाडे, विजय उपरे, संतोष राठोड, योगेश घुगे सर्व पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली आहे.