अवैध देशी दारु आणि मोटार सायकलसह ८९, २००/- रु. चा माल जप्त पोलीस स्टेशन भिसी ची कारवाई

अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द गुन्हा दाखल

अवैध देशी दारु आणि मोटार सायकलसह ८९, २००/- रु. चा माल जप्त

पोलीस स्टेशन भिसी ची कारवाई

दिनांक २६/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन भिसी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार पोस्टे हद्दीत अवैध धंदयावा कार्यवाहीसाठी पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजा लोहारा येथील रहिवासी नामे प्रज्वल धारणे हा अवैधरित्या दारुची वाहतुक करणार आहे. यावरुन भिसी पोलीसांनी पंचासह बोडदा नदीवर सापळा रचुन दबा धरुन बसले असता सदर आरोपी मोटार सायकल ने येत असतांना दिसताच त्याला थांबवून त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यात १८० एमएलच्या १९२ कोकण कंपनीच्या देशी दारु निपा एकुण १९,२००/- रु. किंमतीचा अवैध देशी दारुचा माल मिळुन आल्याने सदर देशी दारु आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन मोटार सायकल किंमत ७०,०००/७ रु. असा एकुण ८९,२००/- रुपयाचा माल हस्तगत करुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन भिसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली भिसी ठाणेदार सपोनि श्री मंगेश भोंगाडे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री रविंद्र वाघ, पोउपनि श्री भारत थिटे, पोहवा अजय बगडे, बाळकृष्ण जिभकाटे, पोअं श्रीकांत वाढवी सर्व पोलीस स्टेशन भिसी यांनी केली आहे.