“फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह” आधा घंटा रोज, फिटनेस का डोस चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमानाने

“फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह”

आधा घंटा रोज, फिटनेस का डोस चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमानाने

भारत सरकारच्या क्रिडा विभागाच्या व ‘फिट इंडिया” मोहिमे अंतर्गत दिनांक २६ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ०६:३० वाजता पटेल हायस्कुल समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पासुन ते दुर्गापूर रोड- प‌द्मापुर गेट ते पोलीस सभागृह तुकूम पर्यत सायकलथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर सायकलथॉन जिल्हा पातळीवरील पोलीस अधिकारी व अंमलदार सह पोलीस कुटूंबियांचा सहभाग असणार आहे तसेच शालेय विद्यार्थी आणि चंद्रपूर शहरातील Go Green Cycle Group चे सदस्यांचा सुध्दा सहभाग असणार आहे.

याद्वारे नागरिकांना आव्हाण करण्यात येते की, सदर सायकलथॉन चा मुख्य उद्देश हा Say No To Drug Dose – आधा घंटा रोज, फिटनेस का डोस या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे.

तरी, जास्तीत जास्त नागरीकांनी सुध्दा या मोहिमेत सहभाग घेवुन चंद्रपूर जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनास चंद्रपूर जिल्हा नशामुक्त आणि फिटनेस जिल्हा बनविण्यास मदत करावे.