घरफोडी चे आरोपीचा शोध घेवुन अवघ्या दोन दिवसात गुन्हा उघड करुण आरोपी कडुन चोरीस गेलेला माल हस्तगत कार्यवाही
पोलीस स्टेशन- चिमुर जि. चंद्रपूर
सदर अपराधाची हकीकत या प्रमाणे आहे की, दि. 11/08/2025 रोजी यातील तक्रारदार पुरुष नामे रामदास वाघमारे रा. कन्हाळगाव ता. चिमुर हा त्याचे पत्नीसह नेहमी प्रमाणे शेतात सकाळी 09/00 वा दरम्यान कामा करीता गेले असता सायंकाळी अंदाजे 07/00 वा. दरम्यान घरी परत आले. घराची पाहाणी केली असता घराचा मागचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांना शंका आली यामुळे त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने बघितले असता त्यांना कुठलेही दागीने दिसुन आलेले नाही. कोन्ही तरी अज्ञात आरोपीने त्याचे दागीने चोरी केल्या बाबत त्यांने पोलीस स्टेशन चिमुर येथे तक्रार दिली.
सदरची तक्रार प्रप्त होताच पोलीस स्टेशन चिमुर येथील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट दिल्या व आजु बाजुचे परिसरात आपले गोपणीय सुत्रधार नेमले. यास दरम्याण गोपणीय सुत्रानकडुन माहिती प्राप्त झाली की, सदर चोरी ही तक्रारदाराचे गावातच राहणारा इसम नामे रोशन बबन वाघमारे वय-33 वर्ष धंदा-मजुरी रा. कन्हाळगाव ता.चिमुर जि. चंद्रपुर याने केल्याची शक्यता आहे. सदर माहितीची शहानिशा करुन संशईत आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबुल केला. आरोपीस अटक करुन त्याची एक दिवस पोलीस कोठडी मिळविण्यात आली त्याच दरम्याण आरोपी कडुन चोरी गेलेला मुद्देमाल 1) सोन्याच्या बागड्या 2 नग वजन 40.50 ग्रॅम कि. 80,000/- रु 2) सोन्याचे मंगळसुत्र 1 नग वनज अंदाजे 20 ग्रॅम कि. 40,000/- रु, व 3) 20,000/- रु नगदी असा एकुन 1,40,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक श्री इश्वर कातकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी चिमुर श्री. दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमुर श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात डी. बी. पथकातील स. फौ. विलास निमगडे, पो.अं रोहीत तुमसरे पो.अं. सचिन खामनकर, पो.अं. सोनु पो.अं. सचिन साठे यांनी केली आहे.