पोडसा ता. गोंडपिपरी मनोरंजन क्लबच्या नावाखाली जुगार भरविणारा क्लबवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई
दिनांक ०९ ऑगस्ट, २०२५ रोजी प्राप्त माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक व उप पोलीस स्टेशन लाठी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोडसा येथील सार्वजनिक ठिकाण मनोरंजन क्लब, राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी, हिरापूर ता. कोरपना जि. चंद्रपूर शाखा पोडसा रजि.नं. एफ-००१४८११ येथे रेड केली असता चालक नामे महेश्वर गोपालनायक अजमेरा वय ४२ वर्ष, रा. चिंताकुंडा ता. शिरपूर जि. आसिफाबाद (तेलंगणा) याने संयोजक यांचेशी संगनमत करुन मनोरंजनच्या नावाखाली अनाधिकृत जुगार खेळविला तसेच परवाना अटी व सुचनांचे जाणिवपूर्वक उल्लंघन केले आहे. सदर ठिकाणी पंचनामा कार्यवाही दरम्यान डीव्हीआर, ताश पत्ते, कॉईन, रजिस्टर असा एकुण ३४५०/- रुपयाचा माल जप्त करण्यात येवुन क्लब चालक, संयोजक, जुगार खेळणारे सदस्य आणि अपप्रेरणा देणारे आरोपीविरुध्द उप पोलीस स्टेशन लाठी येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तरी, नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या कोणत्याही क्लब मध्ये जुगार बाबत असल्यास, त्वरीत जवळील पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील डायल ११२ वर कॉल करुन माहिती दयावी.