अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्यांविरुध्द कारवाई

अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्यांविरुध्द कारवाई

एकुण १० जनावर (गौवंश) सह दोन पिकअप वाहन असा एकुण १९,२०,०००/- रुपयाची माल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी

दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी गोपनिय माहितीवरुन पोलीस ठाणे गोंडपिपरी हद्दीत मौजा वढोली, नांदगांव-विठठ्लवाडा जाणाऱ्या रोडवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे विविध पथकाने नाकाबंदी करुन दोन पिकअप वाहने थांबवुन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात एकुण १० नग जनावर (गौवंश) कोंबुन कत्तलीकरीता नेत असल्याचे दिसुन आल्याने आरोपी नामे (१) मुफीद सरवर अली वय ३१ वर्ष रा. इंदिरानगर वांकडी जि. आसीफाबाद (तेलंगना) (२) रफीक हुसेन सयद वय ३२ वर्ष रा. लक्कडकोट राजुरा, (३) समीर शमशेर खान वय २५ वर्ष (४) महमुद अली दोन्ही रा. वांकडी जि. आसीफाबाद (तेलंगना) यांच्याविरुध्द पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे कलम ११ (१), (घ), (ङ), (च), (ज) भारताचा प्राण्याणा कुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, सहकलम ५ (अ), ९, ११ महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम, कलम ३२५, ३ (५), ९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात येत असुन आरोपीकडुन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक टी.जी. २०-टी ०४६५, आणि एम.एच. ३४ बीझेड-८४३१ आणि १० नग जनावर (गौवंश) व इतर साहित्या असा एकुण १९,२०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.

प्रधान चंद्रकात पोलीस अधीक्षक श्रीम.कात, अपर पोलीस अधीक्षक श्री कातकडे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक श्री अमकाचोरे तपासात पोलीस निरीक्षक श्री अमकाचोर, श्री बलराम झाडाकार, पोउपनि श्री विनोद भुरले, सुनील श्री. गौरकार, पोहवा. इमरान खान, सतीश अवथरे, रजनीकांत पुठावार, किशोर वाकाटे, सुमीत बडे, जयंत लोकर, चेतल गज्जवार, सुरेंद्र महंतो, अजित, हिरालाल गुप्त, प्रदीप, प्रफुल्ल ई. यांनी केली आहे.