अपर पोलीस महासंचालक यांच्या उपस्थितीत अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थी व शेतकरी बांधवांना विविध साहित्याचे करण्यात आले वितरण

अपर पोलीस महासंचालक यांच्या उपस्थितीत अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थी व शेतकरी बांधवांना विविध साहित्याचे करण्यात आले वितरण

प्रोजेक्ट प्रयास अंतर्गत वीर बाबूराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा-२०२४ मध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पोलीस मुख्यालय येथील व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल मैदानाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म. रा. मुंबई श्री. छेरिंग दोरजे यांच्या गडचिरोली भेटी दरम्यान गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत एकलव्य हॉल येथे आज दिनांक ०८/०८/२०२५ रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव व शालेय विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले.

सदर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अतिदुर्गम भागातील विविध ठिकाणाहून ३०० नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपस्थित आदिवासी बांधवांना मान्यवरांच्या हस्ते ०५ शिलाई मशिन, १० स्मोकलेस चुल्हा, १० स्प्रेपंप तसेच टुव्हिलरचे प्रशिक्षण घेतलेल्या २८ प्रशिक्षणार्थ्यांना टु-व्हिलर रिपेअर किट व ६१ शालेय विद्यार्थ्यांना सायकल इत्यादी साहीत्याचे वाटप करण्यात आले. तसेच सन २०२४ साली दुर्गम भागातील एकूण २३,९३५ विद्यार्थ्यांनी वीर बाबूराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांनी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना संबोधित करतांना सांगितले की, ‘पोलीस आणि नागरिकांच्या समन्वयामूळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद कमी झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करत मेहनत घ्यावी तसेच आपण ग्रामीण भागात राहत असल्याबाबत मनात कमीपणा न बाळगता उच्च शिक्षण आणि चांगल्या भविष्यासाठी नेहमी प्रयत्नशिल रहावे. पोलीस दल नेहमीच नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगिन विकासासाठी कटिबद्द आहे.’

गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीना उच्च दर्जाचे व्यावसायिक व कौशल्य प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी ‘पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत प्रोजेक्ट उडान’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास, क्रिडा व संस्कृती या विविध क्षेत्रांत नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कार्यरत आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आजपावेतो १३,९९७ युवक-युवतींना रोजगार स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, ७३७ शेतकऱ्यांना कृषी सहलींचा लाभ, १२४० नागरिकांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया यासोबतच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ७१ सार्वजनिक वाचनालये या प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. तसेच ३,५७८ विद्यार्थ्यांना स्किलींग इन्स्टीट्युटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेवलपर व वेब डेवलपर इ. प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आजपावेतो एकूण १०,७३,९०५ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

यासोबतच मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म. रा. मुंबई श्री. छेरिंग दोरजे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस कवायत मैदान येथिल व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदानाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना कर्तव्यासोबतच आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी या मैदानांचा फायदा होणार आहे.

सदर कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. अनिकेत हिरडे व पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदार तसेच पोलीस मुख्यालयाच्या अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.