चार लाख किंमतीचा भंगार साहित्य घेवुन फरार होणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेश राज्यातुन अटक ट्रक सहित १८,५०,०००/- रु. चा माल जप्त

चार लाख किंमतीचा भंगार साहित्य घेवुन फरार होणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेश राज्यातुन अटक ट्रक सहित १८,५०,०००/- रु. चा माल जप्त

पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी ची कामगिरी

दिनांक २५/०७/२०२५ रोजी राहुल लोहा स्क्रैप ट्रेडर्स खेडमक्ता, ब्रम्हपुरी `येथील ११,४९० किलोग्रॉम भंगार साहित्य ट्रक द्वारे जालना येथे पाठविण्यात आले परंतु ट्रक चालकाने सदर भंगार साहित्य जालना न पोहचविता फिर्यादीचे मालाचा अपहार केला म्हणुन फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे आरोपीविरुध्द अपराध क्रमांक ३३७/२०२५ कलम ३१६ (३) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. ब्रम्हपुरी पोलीसांनी सदर गुन्हयातील ट्रक चालक याचा नाव व पत्ता काढुन आरोपी नामे अनिस युसुफ अली वय २५ वर्ष रा. वार्ड नं. १४ बोडा ता. नरसिंगगढ जि. राजगढ (मध्यप्रदेश) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे कडुन वर अपहार केलेल्या मालातील ९ टन लोहा स्क्रॅम भंगार साहित्य किं ३,५०,०००/- रु. आणि गुन्हयात वापरलेला ट्रक असा एकुण १८,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.

सदरची कामगरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. ब्रम्हपुरी चे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बानबले यांचे नेतृत्वात सपोनि श्री मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, मुकेश गजबे, अजय काटाईत, इरशाद खान, पोअं चंदु कुळसंगे, निलेश तुमसरे, खप्नील पळपगार आणि सायबर पोस्टे येथील सपोनि श्री बलराम झाडोकार व इतर पोलीस अंमलदार यांनी केली आहे.