शहरी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत अर्ज आमंत्रित  

शहरी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत अर्ज आमंत्रित  

चंद्रपूर 1 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील गरजू नागरी लाभार्थ्यांसाठी “रमाई आवास घरकुल योजना (शहरी)” राबविली आत असून या अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 2 लक्ष 50 हजार (बीपीएल) तसेच 2 लक्ष 25 हजार (बीपीएल) इतके आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते.

लाभार्थी पात्रता –

1. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

2. अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.

3. अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.

4. घरकुल बांधकाम महानगरपालिका क्षेत्रात 2 लक्ष 50 हजार रुपयेच्या मर्यादेत करणे आवश्यक आहे.

5. वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखांपेक्षा जास्त नसावी.

6. घराचे बांधकाम चटई क्षेत्र 269 चौ. फूट राहील.

9. घराच्या बांधकामाच्या खर्चामध्ये मनपा हिस्सा १० टक्के राहील. दारिद्रयरेषेखालिल कुटुंबासाठी लाभार्थी हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही.8. अर्जदाराने यापूर्वी घरकुलासंबंधी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे:

1. जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट)

2. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा चालू वर्षाचा) –सत्य प्रत

3. रेशनकार्ड

4. घरटॅक्स पावती (चालू वर्षाची)

5. मतदान ओळखपत्र (व्होटर कार्ड)

6. दारिद्र्य रेषेखालील दाखला (असल्यास)

7. रहिवासी दाखला १५ वर्षांचा (तहसीलदार यांचा )

8. अर्जदारासोबतचा कच्चे घर/झोपडी/खुल्या भूखंडाचा फोटो (सद्यस्थितीतील)

9. अर्जदार पती/पत्नी यांचे पासपोर्ट फोटो

10. इलेक्ट्रिक बिल

11. दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रातील नमुद कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीने घरकुलाचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र (रु. 100/- चा स्टॅम्प पेपरवरील नोटरी करणे)

अर्ज प्रक्रिया:

सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या घरकुल विभागाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क:

घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर शहर महानगरपालिका.