डीएलएड प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरी

डीएलएड प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरी

चंद्रपूर, दि. 28 : डीएलएड प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 च्या तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झालेल्या असून रिक्त जागेवरील प्रवेशाकरिता विशेष फेरी 25 ते 29 जुलै दरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुरू झाली आहे. 12 वी उतीर्ण पात्र विद्यार्थांनी पूर्वीप्रमाणेच www.maa.ac.in या संकेत स्थळावर जाऊन स्वतःचा अर्ज भरावा. अर्ज Approve झाल्यानंतर स्वतःच्या लागीन मधून प्रवेश निश्चित करावा. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरलेला आहे, परंतु प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश शुल्क भरण्याची आवशक्यता नाही. अधिक माहितीकरिता www.maa.ac.in या संकेत स्थळावर भेट देण्यात यावी, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते यांनी कळविले आहे.