अंमली पदार्थाची साठवणूक करून विकी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपीस गडचिरोली प ोलीसांनी घेतले ताब्यात

अंमली पदार्थाची साठवणूक करून विकी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपीस गडचिरोली प ोलीसांनी घेतले ताब्यात

पोमकें मालेवाडा हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झडती घेऊन पोलीसांनी केली कारवाई

एकूण ५,०५,०३०/- रुपयांचा ५०.५ किलो अंमली पदार्थ (गांजा) हस्तगत

गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीसांनी दिनांक २४/०७/२०२५ रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र, मालेवाडा हद्दीमध्ये मौजा धनेगाव व मौजा कातलवाडा येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक २४/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली यांना गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मौजा धनेगाव येथे राहणारा इसम नामे कालीदास पांडुरंग मोहुर्ले याने त्याचे राहते घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगून विक्री करीता साठवून ठेवला आहे. अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि, समाधान दौड हे पोलीस पथकासह मौजा धनेगाव येथे रवाना झाले. गोपनिय माहितीमध्ये नमूद संशयीत इसम नामे कालीदास पांडुरंग मोहुर्ले, वय ४० वर्षे, रा. धनेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये दोन रेघट पांढऱ्या रंगाच्या चुंगळींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) मिळून आला.

सदर चुंगळ्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता, दोन रेघट पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कैनबिस वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा ४०.८२५ कि.ग्रॅ वजन असलेला एकुण ४,०८,२५०/- (अक्षरी चार लाख आठ हजार दोनशे पन्नास) रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीकडे सदर अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता, आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या घरामध्ये सदर अंमली पदार्थ साठवून ठेवल्याचे कबूल केले.

यासोबतच सदर कारवाई दरम्यान पोलीस पथकास गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार, मौजा कातलवाडा येथील इसम नामे तारेश्वर भुपाल चांग, वय ३४ वर्षे याने त्याचे वडील नामे भुपाल चांग यांचे राहते घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगून विक्री करीता साठवून ठेवला आहे. यावरुन पोलीस पथकाने भुपाल चांग यांचे राहते घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये एका शेंदरी रंगाच्या चुंगळींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) मिळून आला. सदर चुंगळ्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता, एका शेंदरी रंगाच्या पिशवीमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, चोंडे व बिया संलग्न असलेले कैनबिस वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा ९.६७८ कि.ग्रॅ वजन असलेला एकुण ९६,७८०/- (अक्षरी छान्नऊ हजार सातशे ऐशी) रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीकडे सदर अंमली पदार्थाबाबत

अधिक विचारणा केली असता, आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या वडीलांच्या राहते घरामध्ये सदर अंमली पदार्थ साठवून ठेवल्याचे कबूल केले.

यावरुन आरोपी क्र. १) कालीदास पांडुरंग मोहुर्ले, वय ४० वर्षे, रा. धनेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली व आरोपी क्र. २) तारेश्वर भुपाल चांग, वय ३४ वर्षे, रा. कातलवाडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, पुराडा येथे आज दिनांक २५/०७/२०२५ रोजी अप. क्र. ७२/२०२५, कलम ८ (सी), २० (बी), २० (बी) (ii) (सी) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आलेला एकूण ५०.५ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. सदर दोन्ही आरोपींना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोउपनि, आकाश नाईकवाडे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. समाधान दौड, सपोनि. भगतसिंग दुलत, मपोउपनि. सरिता मरकाम, पोना/चौधरी, पोअं/गरफडे, गोंगले, मपोना/चव्हान, चापोअं/कोडापे, पोअं/दुधबडे, पंचफुलीवार, चापोअं/लोणारे व फोटोग्राफर देवेंद्र पिदुरकर यांनी पार पाडली.