मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा पडला पार

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा पडला पार

माओवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेल्या नक्षलपिडीत कुटुंबांतील युवक-युवतींना मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट पोलीस शिपाई पदाचे नियुक्ती पत्र प्रदान

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पार पडला उपपोस्टे देचलीपेठा आणि उपपोस्टे जिमलगड्डा येथील नवीन प्रशासकीय इमारतींचा उद्घाटन समारंभ

महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचा आज दिनांक २२/०७/२०२५ रोजी गडचिरोली जिल्हा दौरा पार पडला. यावेळी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते माओवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेल्या नक्षलपिडीत नागरिकांच्या मुला-मुलींना मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस शिपाई पदावर थेट नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यासोबतच उपपोस्टे देचलीपेठा आणि उपपोस्टे जिमलगट्टा येथे बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतींचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

माओवाद्यांच्या क्रूरतेला बळी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पुनर्वसनासाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा, सवलती उपलब्ध नव्हत्या. याचा सारासार विचार करुन शासन निर्णय २०१८ अन्वये नक्षलपिडीत कुटुंबियांना शासनाच्या विविध विभागांमध्ये गट क व ड च्या पदांवर थेट नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आली. या अन्वये सन २०२५ मध्ये एकूण २३ नक्षलपिडीत तरुणांना पोलीस शिपाई पदावर थेट नियुक्ती देण्यात आली आहे. सदर २३ पैकी दोन नक्षलपिडीत कुटुंबांतील तरुणांना मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पोलीस शिपाई पदावर थेट नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच मागील तीन वर्षात एकूण ५६ नक्षलपिडीत तरुणांना गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर थेट नियुक्ती देण्यात आलेली असून उर्वरित नक्षल पिडीत कुटुंबियांना देखील लवकरात लवकर नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

यासोबतच एकेकाळी माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेला गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासकिय यंत्रणांसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे देचलीपेठा आणि उपपोस्टे जिमलगट्टा या दोन पोलीस स्टेशनच्या इमारतींच्या बांधकामासाठी केंद्र शासनाच्या वतीने विशेष पायाभूत योजना निधीतून प्रत्येकी २.५ कोटी रुपये निधी मंजूर करून देण्यात आला होता. या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतींचे आज मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सदर सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतींमूळे अतिदुर्गम भागात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सर्व सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, ‘सन २०१८ साली आम्ही नक्षलपिडीत नागरीकांच्या सहाय्यतेसाठी शासन निर्णय पारित करून नक्षलपिडीत कुटुंबातील व्यक्तींना विविध शासकीय विभागामध्ये थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला होता. सन २०२५ या वर्षात या शासन निर्णयाच्या आधारे एकूण २३ युवक-युवतींना पोलीस शिपाई पदावर थेट नियुक्ती देण्यात येत आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे. माओवादी संघटनांमध्ये सक्रीय असलेल्या सदस्यांची संख्या आता केवळ बोटावर मोजण्याइतकी राहीलेली असून, माओवादी संघटनेतील उर्वरीत माओवाद्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी आत्मसमर्पण करुन संविधानाचा मार्ग स्विकाराया.’

यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल, मा. आमदार, विधान परिषद सदस्य श्री. परिणय फुके, मा. आमदार, अहेरी विधानसभा मतदारसंघ श्री. राजे धर्मरावबाबा आत्राम, मा. आमदार, गडचिरोली विधानसभा मतदारसंघ डॉ. श्री. मिलींद नरोटे, मा. आमदार, आरमोरी विधानसभा मतदारसंघ श्री. रामदास मसराम, वन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती. मनिषा म्हैसकर, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, जिल्हाधिकारी गडचिरोली श्री. अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. व इतर मान्यवर उपस्थित होते.