चार्मोशी फाटा मुल येथे मोबाईल हिसकावुन मोटार सायकलने पळुन जाणारे जबरी चोरी करणारे दोन युवक अटक
चोरीस गेलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण ६०,०००/- रु. चा माल
पोलीस स्टेशन मुल ची कामगिरी
दिनांक १५/७/२०२५ रोजी फिर्यादी श्री विवेक पांडुरंग कोटनाके वय ३१ वर्ष रा. एकारा हे रात्रौ २१:०० वाजता सुमारास मौजा चामोर्शी फाटा मुल रोडवरुन जात असतांना मोटार सायकल क्र. MH34-T-561 चा स्वार त्याचे मागे बसलेला इसम असे दोद्यांनी फिर्यादी चे हातातील मोबाईल हिसकावून चोरुन पळुन गेले. अशा फियादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक २५५/२०२५ कलम ३०४, ३(५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
मुल पोलीसांनी यातील फिर्यादीने सांगितलेल्या आरोपीतांचे कपडयाचे वर्णन व मोटार सायकल क्रमांकावरुन आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे (१) तनिश ओम मंडलेकर वय १९ वर्ष रा. ताडाला रोड, मुल (२) क्रिशन प्रेमदास शेडमाके वय १९ वर्ष रा.हळदी ता. मुल यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन गुन्हयातील चोरलेला फिर्यादीचा पोको कंपनी मोबाईल किं. १०,०००/- रु. आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकल क्र. MH34-T-561 किं. ५०,०००/- रु. असा एकुण ६०,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला असुन पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री सुधाकर यादव – उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर प्रभारी उपविभाग-मुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे मुल चे पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि श्री सुबोध वंजारी, पोहवा /२४० जमीर खान पठाण, पोहवा /२३९७ भोजराज मुंडरे, नापोअं/२४९७, पोअं/१८३ नरेश कोडापे, पोअं/१२३२ शंकर बोरसरे, पोअं/१३९ संदीप चुधरी सर्व पोलीस स्टेशन मुल यांनी केली आहे.








