मौजा भोयगांव ते नारंडा नाकाबंदी करून गौवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडुन ३९ गौवंशीय जनावरांची सुटका, १९,१०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त

मौजा भोयगांव ते नारंडा नाकाबंदी करून गौवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडुन

३९ गौवंशीय जनावरांची सुटका, १९,१०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन गडचांदूर ची कामगिरी

दिनांक १२ जुलै, २०२५ रोजी गडचांदुर पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन मौजा भोयगांव ते नारंडा मार्गावरील टी-पॉईंट जवळ नाकाबंदी करून एक आयशर क्रमांक MH40-TC-4812 भोयगांव कडुन नारंडा कडे जाणाऱ्या रोडच्या दिशेने येत असल्याने त्याला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता सदर आयशर वाहनात एकुण ३९ गोवंश जनावरे निर्दयपणे व कुरपणे वाहनाच्या डाल्यात क्षमतेपेक्षा जास्त संख्येने डांबून वाहतुक करीत असल्याचे दिसुन आल्याने सदर आयशर चालक व त्याचे सहकारी असे एकुण ४ आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवून ३९ गोवंशीय जनावराची सुटका करण्यात आली. सदर गुन्हयात आरोपी क्र. (१) हाफीज खान गुफरान खान, (२) करीम खान नबी खान (३) सादीक नवाब खान तिन्ही रा. गडचांदुर यांना अटक करण्यात आली असुन गुन्हयात एक आयशर वाहन आणि ३९ गोवंशीय जनावरे असा एकुण १९,१०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एक पाहिजे असलेला आरोपी नामे शेख इब्राहीम शेख इस्माईल रा. उप्पलवाडी नागपूर यास अटक करण्यात येत असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रविंद्र जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री शिवाजी कदम यांचे नेतृत्वात पोउपनि राधिका गायकवाड, पोहवा शितल बोरकर, नापोअं बलवंत शर्मा, पोअं प्रकाश बाजगीर, सुरज ढोले, मनोहर जाधव, साईनाथ उपरे, श्रीनिवास सोडनर, रमेश कार्लेवाड सर्व पोलीस स्टेशन गडचांदुर यांनी केली आहे.