मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 4 : सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, 1959 व नियम 1960 अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना, त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचा-यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुषंगाने एप्रिल ते जुन 2025 अखेर संपणाऱ्या तिमाहिची माहिती नमुना ई.आर.-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, चंद्रपूर या कार्यालयाव्दारे ऑनलाईन पध्दतीने दि. 1 जुलै, 2025 पासून सुरू झाले आहे. याकरीता सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यास्तव चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझर आयडी व पासवर्ड देण्यांत आले आहेत. ज्या आस्थापनांना प्राप्त झालेले नाही त्यांनी प्राप्त करून घ्यावा. त्या युझर आयडी व पासवर्डचा वापर करून www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

माहे एप्रिल ते जून 2025अखेर संपणाऱ्या तिमाही विवरणपत्र सादर करावयाची अंतिम तारीख 31 जुलै, 2025 आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास, ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com यावर तसेच दुरध्वनी क्र. 07172-252295 वर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी कळविले आहे.