रुग्णांना अधिक चांगली सेवा देण्यावर मनपा आरोग्य केंद्रांचा असणार भर – आयुक्त विपीन पालीवाल
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकानुसार करणार आरोग्य सेवा
चंद्रपूर 2 जुलै – नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी मनपा रुग्णालयांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. त्यातही स्वच्छता, रुग्णाचे समाधान यावर अधिक भर दिला जात आहे. ‘एनक्यूएएस’ मानांकनासाठी आवश्यक त्या सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचे मनपाचे ध्येय असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स डे कार्यक्रमात संबोधित करतांना सांगितले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मनपा आरोग्य केंद्रांच्या सेवा या
एनक्यूएएस (NQAS) म्हणजे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकानुसार कश्या करता येतील यावर चर्चा करण्यात आली. एनक्यूएएस (National Quality Assurance Standards) ही मानके आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये (public health facilities) चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी तयार केली आहेत.
एनक्यूएएसचा मुख्य उद्देश सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये (public health facilities) आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे हा आहे. एनक्यूएएसमध्ये सेवा तरतूद, स्वच्छता,रुग्णांचे अधिकार, इनपुट, रुग्णांचे समाधान, रुग्णांना दिली जाणारी सेवा,सहाय्यक सेवा, क्लिनिकल काळजी, संसर्ग नियंत्रण आणि गुणवत्ता व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी मानके निश्चित केलेली आहेत.
आरोग्य सुविधा या मानकांनुसार काम करत आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांचे मूल्यांकन केले जाते. जर त्यांनी चांगले काम केले, तर त्यांना एनक्यूएएस प्रमाणपत्र दिले जाते.शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राला (UPHC) एनक्यूएएस प्रमाणपत्र मिळाल्यास, त्यांना शासनाकडून अधिक निधी मिळतो. एनक्यूएएसच्या निकषांमुळे आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारते, रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळते, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होतात, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढतो.
त्यामुळे यापुढे मनपाची 7 प्रा. आरोग्य केंद्रे व 21 आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकानुसार सुविधा व सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.याप्रसंगी उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, डॉ.अश्विनी भारत,डॉ.जयश्री वाडे,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.अर्वा लाहिरी,डॉ.शरयु गावंडे,डॉ.अल्फीया खान,डॉ.नेहा वैद्य व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.