देशी दारुची अवैध वाहतुक करणारे इसमास अटक, १ लक्ष ५० हजार रुपयाची मालमत्ता जप्त
पोलीस ठाणे पाथरी ची कार्यवाही
दिनांक २५ जुन, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत मौजा मेहा (बुज) गोसी खुर्द नहराजवळील रोडवर नाकाबंदी करुन चारचाकी वाहन मारोती कार क्र. एम.एच.२९-जे-०४४८ यास थांबवुन पंचासमक्ष सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनात ठेवलेली देशी दारु च्या ९० एम.एल. च्या एकुण २००० नग बॉटल २० बॉक्स मध्ये असल्याचे दिसुन आल्याने सदर मारोती कार किं. ८०,०००/- रु आणि अवैध दारु किं. ७०,०००/- असा एकुण १,५०,०००/- रुपयाचा माल मिळुन आल्याने आरोपी नामे रमेश राजु ताडपल्लीवार वय ४२ वर्ष रा. अंतरगाव टोला ता. सावली जि. चंद्रपूर यास अटक करुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन पाथरी चे ठाणेदार सपोनि श्री नितेश डोर्लीकर यांचे नेतृत्वात पोउपनि खोब्रागडे, सफौ यशवंत कोसमशिले, पोअं बळीराम बारेकर, प्रविण कोवे, अमित मस्के, गजेंद्र डेंगळे, खेलेश कोरे, मपोअं शोभना सुरे सर्व पोस्टे पाथरी यांनी केली आहे.