गडचिरोली जिल्ह्यातील विविध वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्यीय टोळीला गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद
विविध गुन्ह्यांतील एकुण १६,०५,०००/- रुपये किंमतीच्या ४२ दुचाकी वाहनांचा पोलीसांनी लावला शोध
बनावट कागदपत्रे तयार करून चोरीच्या वाहनांची केली जात होती विकी
गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या वाहन चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी वेळोवेळी कठोर कारवाई करण्याबाबत सूचना सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें च्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोमके सावरगाव येथे दि ०९/०६/२०२५ रोजी कलम ३०३(२), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३ (५) भा.न्या.सं. अन्वये अप.क्र. १७/२०२५ गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना साक्षीदार तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोमकें सावरगाव पोलीसांनी आरोपी विनयप्रकाश धरमु कुजुर, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली याची ओळख पटविली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोमकें सावरगाव पोलीसांनी आरोपी विनयप्रकाश धरमु कुजुर, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली याला अधिक चौकशीसाठी राजनांदगाव कारागृहामधून ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपीने मोटार सायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याबाबत कबूली दिली होती.
यादरम्यान आरोपीकडे सदर गुन्ह्यांबाबत सखोल चौकशी केली असता, आरोपी हा आपल्या साथीदारांच्या मदतीने वाहन चोरी करुन सदर चोरीच्या वाहनांचे बनावट कागदपत्रे बनवून फसवणुकीने सदर वाहनांची विक्री करत होता असे तपासात निष्पन्न झाले. यावरुन आरोपीचे साथीदार नामे १) रवनू दसरु पदा, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, २) राकेश छबीलाल बादले रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, ३) रामु झिकदुराम धुर्वे, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली, ४) संजय मुन्ना लकडा रा. कवड्डू ता. राजपुर जि. बलरामपुर (छ. ग.), ५) राजेंद्र चूंदा लकडा रा. कवडू ता. राजपुर जि.बलरामपुर (छ. ग.), ६) राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे रा. तळेगाव ता. कुरखेडा जि. गडचिरोली, यांना गडचिरोली पोलीसांनी अटक केली असून आरोपींना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपी विनयप्रकाश धरमु कुजुर, रा. गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली याच्यासह सर्व ०७ आरोपींना दिनांक २०/०६/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोमकें सावरगाव व स्थागुशा गडचिरोली यांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करुन आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे गडचिरोली जिल्ह्यतील पोस्टे मुरुमगाव, पोस्टे कोरची, पोस्टे आरमोरी, पोस्टे पुराडा, पोस्टे कोटगुल, पोस्टे धानोरा तसेच छत्तीसगड येथे दाखल एकुण १४ गुन्हे उघडकीस येऊन गडचिरोलीसह छत्तीसगड येथील एकुण ४२ दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात गडचिरोली पोलीसांना यश आले आहे. याबरोबरच तपासाअंती अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोमकें सावरगाव येथील पोउपनि. विश्वंभर कराळे हे करीत आहेत.
सदर तपास पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा (अतिरिक्त कार्यभार) श्री. रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा गडचिरोलीचे पोनि श्री. अरूण फेगडे, सपोनि श्री. भगतसिंग दुलत, पोमके सावरगाव येथील पोउपनि. विश्वंभर कराळे, पोउपनि राजेंद्र कोळेकर, मपोउपनि सिध्देश्वरी राऊत व स्थागुशा गडचिरोली आणि पोमके सावरगावच्या अंमलदार यांनी पार पाडली.