बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरी करणारे ४ आरोपी अटक पोलीस ठाणे ब्रम्हपुरी ची कारवाई

बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरी करणारे ४ आरोपी अटक पोलीस ठाणे ब्रम्हपुरी ची कारवाई

दिनांक २ मे, २०२५ रोजी फिर्यादी नामे प्रकाश रामचंद्र कुथे यांनी पोस्टे ब्रम्हपुरी येथे रिपोर्ट दिली होती की, मौजा बेलदाटी शेत शिवारात वाहणारे नाल्यावर शेतकऱ्यांना जाण्या-येण्याकरीता व शेतीला पाणी देण्याकरीता पाणी अडवून ठेवण्याकरीता मृद सौंधारण विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत दिड वर्षापूर्वी बंधारा बांधुन त्यात ४९ नग लोखंडी प्लेटा लावलेल्या होत्या त्यापैकी ३० नग लोखंडी प्लेटा किं. ६०,०००/- रुपयाचा कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला. यावरुन अप.क्र. १८६/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरीता गोपनिय बातमीदार नेमुन गुन्हयाचा तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करुन प्राप्त माहितीवरुन आरोपी नामे (१) राकेश विजय वैरकार वय २५ वर्ष, (२) छगन विजय गुरनुले वय २१ वर्ष, (३) सुरज उध्दव मेश्राम वय २३ वर्ष (४) महेश रविंद्र सहारे वय २२ वर्ष सर्व रा. ब्रम्हपुरी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला एकुण ३० नग लोखंडी प्लेटा किं. ६०,०००/- रु. आणि गुन्हयात वापरलेला वाहन महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH40-BG-3866 किं. २,००,०००/- असा एकुण २,६०,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बानबले यांचे नेतृत्वात सपोनि श्री मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, अजय कटाईत, नापोअं मुकेश गजबे, पोअं स्वप्नील पळसपगार, चंदु कुरसंगे, निलेश तुमसरे सर्व पोस्टे ब्रम्हपुरी यांनी केली आहे.