जबरी चोरी करणारा आरोपी अवध्या २४ तासात रामनगर गुन्हे शोध पथकाचे ताब्यात चोरलेली रोख रक्कम ५०,०००/- रुपये हस्तगत रामनगर पोलीस स्टेशनची कारवाई

जबरी चोरी करणारा आरोपी अवध्या २४ तासात रामनगर गुन्हे शोध पथकाचे ताब्यात चोरलेली रोख रक्कम ५०,०००/- रुपये हस्तगत रामनगर पोलीस स्टेशनची कारवाई

यातील फिर्यादी नामे मधुराम तुलसींग कोल्हा वय ३४ वर्ष रा. कोडाखुरी ता. द्रककोंड जि. कांकेर छत्तीसगड हे दिनांक १३ जुन, २०२५ रोजी रात्रौ ८:०० वाजता सपना टॉकीज जवळ जलनगर वार्ड चंद्रपूर येथे पाणी बॉटल घेण्यास गेला असता एक अज्ञात इसमाने त्याचे मागे येवुन त्याचे तोंडाला दाबुन त्याचे खिशातून ५०,०००/- रु. नगदी जबरीने हिसकावून नेला. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोस्टे ला अप.क्र.४७०/२०२५ कलम ३०९ (६) भारतीय न्याय संहिता अन्वये जबरीचोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्हयाची माहिती मिळताच पो.स्टे. रामनगर येथील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ गाठुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी गुप्त बातमीदार व तांत्रिक दृष्टया तपास करुन मिळालेल्या माहितीवरून आरोपी शेख जुबेर शेख कादर वय ३३ वर्ष रा. रहमतनगर चंद्रपूर यास अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली रक्कम ५०,०००/- रु. रोख जप्त करण्यात आले असुन सदर आरोपी अवध्या २४ तासाचे आत पकडण्यात यश आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि देवाजी नरोटे, सपोनि हनुमान उगले, सपोनि निलेश वाघमारे, पोहवा पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आंनद खरात, प्रशांत शेंद्रे, लालु यादव, जितेंद्र आकारे, मपोहवा मनिषा मोरे, पोअं. संदीप कामडी, पंकज ठोंबरे, सुरेश कोरवार, मपोअं ब्युल्टी साखरे सर्व पो.स्टे. रामनगर यांनी केली आहे.