मुल पोलीसांनी कोंबडा बाजार जुगारावर धाड टाकून तिनं आरोपींना केले अटक
७,२४,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
दिनांक ०८/०६/२०२५ रोजी दुपारी मिळालेल्या गोपनिय बातमी वरून पो स्टे मुल कार्यक्षेत्रा अंतर्गत असलेले स्मशान भुमी जवळ मौजा चक फुटाणा ता पोंभुर्णा जि चंद्रपुर सार्वजनिक ठिकाणी वेळ १७:३० वा पंच व पोलीस स्टॉफसह रेड केली असता, काही ईसम कोंबडयांच्या पायांना काती बांधुन त्यांची झुंज लावुन त्यावर पैशांची बाजी लावुन कोंबडयांचा व पैशांचा हारजितचा जुगार खेळीत असतांना दिसुन आले. ते आम्हास पाहुन पळत असता त्यामधुन आम्ही पाठलाग करून नमुद कोंबडा बाजार जुगार खेळणारे तिन ईसमांना पकडण्यात आले. उर्वरीत १० जुगारी ईसम हे त्यांचे वाहन मौक्यावर सोडुन पळुन गेले. घटनास्थळी पळुन गेलेले जुगारी ईसमांचे मोटार सायकल व कालीपिली वाहने तसेच मिळुन आलेले पाच कोंबडे व २० लोखंडी धारधार कात्या व पकडण्यात आलेले जुगारी ईसम यांचे अंगझडती मध्ये नगदी रूपये असे एकुण ७,२४,७००/-रू चा माल मिळुन आल्याने पोलीस स्टेशन मुल येथे एकुण १३ आरोपीतांवर अपराधथ क. २१५/२०२५, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.