प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु (Eagle, Hola, Shisha Hookah, Vimal, V-1) विक्री करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल एक आरोपी अटक…

प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु (Eagle, Hola, Shisha Hookah, Vimal, V-1) विक्री करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल एक आरोपी अटक…

सुगंधीत तंबाखु व ऑटो असा एकुण ५,९९,३२६/- रु.ची मालमत्ता जप्त पोलीस स्टेशन राजुरा ची कारवाई …

दिनांक ०५ जुन, २०२५ रोजी गोपनिय माहितीचे आधारे पोलीस ठाणे राजुरा ह‌द्दीतील संविधान चौक येथे नाकाबंदी करुन एक ऑटो क्रमांक MH34-D-6339 यास थांबवून पंचासमक्ष पाहणी की असता सदर ऑटो चालक नामे अविनाश आबाजी शेंडे वय ४२ वर्ष रा. बाबुपेठ चंद्रपूर याचे ताब्यात ऑटो मधील बोरी मध्ये प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु (१) ईगल हुक्का शिशा तंबाखु २०० ग्रॅमचे सिलबंद १३२ नग पाउच प्रत्येकी ४१५/- रु. प्रमाणे एकुण कि.५४,७८०/- रु. (२) होला हुक्का शिशा नाव असलेले २०० ग्रॅमचे सिलबंद १५० पॉकीट प्रत्येकी २६५/- रु. प्रमाणे एकुण ३९,७५०/- रु. (३) विमल पान मसाला १२६.५ ग्रॅमचे सिलंबद २२ पॉकीटे प्रत्येकी २२ रु. प्रमाणे कि. १९८/- रु. (४) वी-१ तंबाखु २० सिलंबद पुडी प्रत्येकी २२ रु. प्रमाणे ४४०/- रु. आणि प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु मिळुन आल्याने सदर प्रतिबंधीत तंबाखु आणि वाहतुकी करीता वापरलेला ऑटो किं. ५,००,०००/- असा एकुण ५,९९,३२६/- रुपयाचा माल जप्त करुन आरोपीविरुध्द अप. क्र.२७५/२०२५ कलम १२३, २२३, २७५ भारतीय न्याय संहिता सहकलम २६(२)(a), २६(२) (i), २६ (२) (iv), ५९ अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ त्या अंतर्गत नियम व नियमने २०११ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोस्टे राजुरा चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी यांचे नेतृत्वात पोउपनि श्री भिष्मराज सोरते, श्री पांडुरंग हाके, पो.अं. विक्की निवार्ण, प्रभाकर कोराम, जुमनाके, महेश बोलगोडवार, अविनाश बांबोडे, शफीक शेख, आनंद मोरे, शरद राठोड सर्व पोस्टे राजुरा यांनी केली आहे.