नागभिड,आकापुर येथे शेतकरी संघटने ची स्थापना
अध्यक्ष तुकाराम निकूरे, उपाध्यक्ष अमोल भाकरे, सचिव प्रशांत भाकरे यांनी स्विकारला पदभार
नागभिड तालुक्यामधील आकापुर या गावी दिनांक 31/ 5 /2025 रोज शनिवारला आकापूर येथे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि हक्क व समाधान करणे, तसेच बोनस, कर्जमाफी व आता शेतकऱ्यांसमोर असणारी समस्या शेतकऱ्यांचे बँक खाते लॉक केल्यामुळे शेतकऱ्यांना अर्थिक व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी व शेतकऱ्यांवर येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस पूर ,गारपीट यामुळे होणारी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ,विविध हक्क व कर्तव्य यासाठी यासाठी संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्याकरिता व शेतकऱ्यांविरोधात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ,आवाज उठवण्याकरिता आकापूर येथे शेतकरी संघटना स्थापन करण्यात आली.
खालील कार्यकारणी गठीत करण्यात आली.
अध्यक्ष- तुकाराम मुरलीधर निकूरे.
उपाध्यक्ष- अमोल टेमदेव भाकरे.
सचिव- प्रशांत सुखदेव भाकरे
सहसचिव- आशिक वामन भाकरे
कोषाध्यक्ष- मिलिंद दानोदास भाकरे
सहकोषाअध्यक्ष- रवींद्र माणिक आत्राम
प्रचार प्रमुख- आतिश श्रीकृष्ण भाकरे, मोतीराम दशरथ भाकरे, देवानंद नानाजी बाळबुद्धे, मुखरू दादाजी ठीकरे, संतोष मुरलीधर भाकरे, चोकेश्वर
बळीराम सोनवणे, सुनील दादाजी चनफणे, वसंता पैकुजी भाकरे, रतीब गणपत वेटे.
संघटक -खुशाल पिसाराम भाकरे, प्रकाश वासुदेव भाकरे,रोशन गजानन गाहाने, अरविंद रामकृष्ण भाकरे,
विजय रामराव भाकरे, विनोद केशव भाकरे, लक्ष्मण वासुदेव कुळमेथे, व्यंकटेश नरसू भाकरे, विलास नारायण भाकरे, श्रीराम बालाजी भाकरे, अंबादास कुंभरे, सुरेश भाकरे, देवराव हणुजी भाकरे, जनार्धन दादाजी नीकुरे
इत्यादी शेतकऱ्यांची शेतकरी संघटनेची कार्यकारणी स्थापित करण्यात आली व इतर सर्व आकापूर (टोला) येथील संपूर्ण शेतकरी सभासद म्हणुन या ठिकाणी ठेवण्यात आले.
याच प्रमाणे संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण पण याच प्रमाणे प्रत्येक गावामध्ये एक शेतकरी संघटना तयार करून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी तयार व्हावा. ही आग्रहाची विनंती.
या महिन्यामध्ये बोनस न जमा झाल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार.