बस स्थानक परिसरातुन प्रवाश्यांचे सोन्याचे दागीने चोरी करणारी महिलांची टोळी पकडण्यात पोलिसांना मोठा यश
सोन्याचे दागीने एकुण २,५०,०००/- रुपयाची जप्त पोलीस स्टेशन मुल ची कारवाई
फिर्यादी नामे ही दिनांक ६/५/२०२५ रोजी सकाळी १०:४५ वा. दरम्यान मुल बस स्थानक येथे येथुन प्रवाश्यांचे गर्दीत बस मध्ये चढुन बसच्या आत गेली असता तिचे गळयातील असलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याची गोप कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गर्दीचा फायदा घेवुन गळयातुन काढुन चोरी केल्याचे तक्रारीवरुन पोस्टे मुल येथे अप.क्र. १८३/२०२५ कलम ३०३ (२) ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. यावरुन मुल पोलीसांनी बस स्थानक परिसरात सतत लक्ष ठेवुन सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या टोळीच्या मागावर असतांना दिनांक ३०/५/२०२५ रोजी पेट्रोलींग दरम्यान सदर टोळीच्या महिला नामे (१) सौ. जमुना हितेश उर्फ संदिप नाडे उर्फ वाघमारे वय ३५ वर्ष (२) सौ. लक्ष्मी जगनु मानकर वय ४० वर्ष दोन्ही रा. रामेश्वरी टोली, ता. नागपुर यांना ताब्यात घेवुन त्याचे कडे कौशल्यपुर्ण व तांत्रीक पध्दतीने तपास केला असता सदर महिला हयांचेविरुध्द नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती तसेच हैदराबाद येथील विविध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातंर्गत बस स्थानक परिसरात प्रवाश्यांचे सोन्याचे दागीने चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर महिलांकडे बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी दिनांक ६/५/२०२५ रोजी आणि २०/५/२०२५ रोजी मुल बस स्थानकावरुन प्रवाश्यांचे सोन्याचे दागीने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडुन २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने किंमत २,५०,०००/- रुपयाचे जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री सुबोध वंजारी यांचे नेतृत्वात पोउपनि श्री भाऊराव बोरकर, पोहवा भोजराज मुडरे, जमीरखान पठाण, नापोअ चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, मपोहवा सिमा निषाद सर्व पोस्टे मुल यांनी केली आहे.
सर्व नागरीकांनी आवाहन करण्यात येते की, बस मध्ये चढत उतरत असतांना आपल्या दागीन्यांची व मोबाईलची काळजी घ्यावी. शक्यतो प्रवासादरम्यान सोन्याचे दागीने घालण्याचे टाळावे.