रेकॉर्ड वरील आरोपी सफरोज उर्फ टायगर याचेकडुन ६,६०,०००/-रूपयाचे सोन्याचे व चांदीचे दागीने स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केले जप्त…
दिनांक ३१/०५/२०२५ रोजी फिर्यादी नामे संगिता जनार्धन पाटील, वय-६१ वर्ष, रा. डिस्पेन्सरी चौक, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यांनी पोरटे रामनगर येथे तक्रार दिली की, मागील दोन-तिन महिण्यापुर्वी फिर्यादी ही तिचे घराला लॉक करून तिचे मुलीचा उपचार करीण्याकरीता परिवारासह टाकळघाट, ता. बुटीबोरी, जि. नागपुर येथे गेली होती. दिनांक ३१/०५/२०२५ रोजी फिर्यादी हिचे घराशेजारी फोन करून घराचे लॉक तुटलेले आहे असे सांगितले वरून फिर्यादी घरी घरी येवुन पाहीले असता घरामधील आलमारीतील सोन्याचे व चांदीचे दागीने कोणी तरी अज्ञात चोराने चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप. क्रमांक ४२७/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(३),३३१ (४) भारतीय नागरीक सुरक्षा सहिता सन २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांर्भीय पाहता, सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी असे मा. पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक, स्थागुशा यांचे नेतृत्वात चंद्रपुर पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात खाना होवुन अथक परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून मुखबिरचे खबरे वरून आरोपी नामे सरफरोज सगीर शहा, वय-२४ वन, रा. आमटे लेआउट, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस करून त्याचेकडुन ६८ ग्रॅम सोन्याचे दागीने किमंत अंदाजे ६,६०,०००/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले,, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/दिपक डोंगरे, पोअ/प्रशांत नागोसे, पोअ/किशोर वाकाटे, पोअ/शशांक बदामवार, पोशि/रूषब बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.