चोरी गेलेली मोटारसायकलचा सिंदेवाही पोलीसांनी शोध लावुन एका आरोपीस केला अटक
पोलीस स्टेशन सिन्देवाही येथे दि.09/05/2025 रोजी मोटारसायकल स्प्लेंडर प्लस क्र.MH 34 CE 8796 ही चोरी केल्याबाबत तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे ब्रह्मपुरी, पोलीस निरीक्षक विजय राठोड सिन्देवाही, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ ठवकर , पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले यांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास नापोअ नारायण येगेवार, Asi देशमुख मेजर, pc अक्षय चाचरे, कमलेश फ्रेंडर व पथकाने केला असून सदर गुन्ह्यात गोपनीय माहिती द्वारे आरोपी नामे पप्पू मेघशाम ठाकरे वय २५ वर्ष रा.कोसंबी ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर याची ताब्यात मिळून आल्याने व त्याने कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे कडून चोरीस गेलेली मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली