रोजगाराच्या संधी विद्य्यार्थ्यांचा विकास करतील – प्राचार्य डॉ सुशील कुंजलवार
सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही व स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने, एक दिवसीय प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. विद्या प्रसारक संस्थेचे सचिव मा. अरविंदजी जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लेसमेंट ड्राइव्ह चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष राम जैस्वाल यांनी भूषवले. मार्गदर्शक म्हणून स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि.चे HR अधिकारी नितिन ढोले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना करिअरविषयक महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार आपल्या प्रस्ताविक मार्गदर्शन करतांना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे,असे संबोधित केले. आमचे महाविद्यालय हे केवळ शिक्षण देणारे संस्थान न राहता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे, याचेच हे एक ठोस उदाहरण आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही. उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य, आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन आणि व्यावसायिक दृष्टिकोन अत्यंत गरजेचे आहे. या सर्व गुणांना वाव देण्यासाठी अशा प्लेसमेंट ड्राइव्हसारख्या उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाचे डॉ रीज़वान शेख, प्रा अमित ऊके यांनी योग्य व्यवस्थापन केले. कार्यक्रमात पत्रकार संदीप बांगडे, खालिद पठान उपस्थित होते
या ड्राइउ मधे दोन विद्य्यार्थ्यांची नेमणुक करण्यात आली. महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ज्यामुळे महाविद्यालयाच्या प्लेसमेंट उपक्रमाला एक सकारात्मक चालना मिळाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा चेतना अगड़े यानी केले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेकडे नेण्यात महाविद्यालयाचे प्रा साहेबराव आड़े, प्रा प्रफुल्ल रणदिवे, प्रा अपर्णा कोवे प्रा तुकाराम बोरकर यांनी सहकार्य केले.