मुल हद्दीतील मोरवाही येथील वयोवृध्द महिलेस मारहाण करुन जबरी चोरी करणारे दोन आरोपी अटक

मुल हद्दीतील मोरवाही येथील वयोवृध्द महिलेस मारहाण करुन जबरी चोरी करणारे दोन आरोपी अटक

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कारवाई

दिनांक २० मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन मुल ह‌द्दीतील मौजा मोरवाही येथील रहिवासी श्रीमती ध्रुपताबाई प्रल्हाद रायपुरे वय ६५ वर्ष ही आपले राहते घरी झोपेत असतांना रात्रौ १:०० वा. सुमारास अज्ञात दोन इसम तिच्या घराचे मागच्या बाजुला रचुन ठेवलेल्या विटा बाजुला करुन घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी वयोवृध्द महिलेस तोंडावर हाताबुक्कयांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले व तिचे गळयामध्ये असलेले ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र किं.४०,०००/- रुपयाचा माल जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेले होते. यावरुन पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक २००/२०२५ कलम ३०९ (१), ३३३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्हयांचे गांभीर्य पाहता, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील एक शोध पथक मुल परिसरात पाठवुन कौशल्यपुर्ण व तांत्रिक तपासावरुन गुन्हयातील आरोपी (१) नामे प्रनिकेत दिलीप शेन्डे वय २२ वर्ष, (२) तनिष्क ओम मंडलेकर वय १९ वर्ष दोन्ही रा. ताडाळा रोड वार्ड क्र.११ मुल यांना ताब्यात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार नामे नयन रामटेके रा. मुल याचेसह मिळुन सदर गुन्हा केला असुन चोरीचा मंगळसुत्र मध्यप्रदेश राज्यातील नयनपुर येथे विकल्याचे सांगत असल्याने दोन्ही आरोपी पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मुल चे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, श्री सुनिल गौरकार, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, चेतन गज्जलावार, पोअं. प्रशांत नागोसे, प्रफुल्ल गारघाटे, किशोर वाकाटे, शेशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.