विध्वंसक कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने घेतले ताब्यात

विध्वंसक कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने घेतले ताब्यात

एक डिव्हीसीएम, एक एसीएम दर्जाचे वरिष्ठ माओवाद्यांसह तीन प्लाटून सदस्य पदावरील जहाल माओवाद्यांना अबुझमाडचे बिनागुंडा परिसरातून घेण्यात आले ताब्यात

वरिलपैकी ०३ माओवाद्यांना अटक व इतर ०२ माओवाद्यांना घेतले ताब्यात

एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक ३०३ रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार असे एकूण ०७ हत्यार (अग्निशस्त्रे) जप्त

टीसीओसी कालावधीमध्ये गडचिरोली पोलीसांनी घातपाताचा मोठा डाव उधळला

महाराष्ट्र शासनाने पाचही माओवाद्यांवर जाहीर केले होते एकूण ३६ लाख रुपयांचे बक्षीस

गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्यांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पाच माओवाद्यांना आज दिनांक २०/०५/२०२५ रोजी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने ताब्यात घेवून त्यापैकी तिघांना अटक केली असून इतर दोन माओवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण १०३ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी अतंर्गत येणा-या मौजा बिनागुंडा येथे ५० ते ६० च्या संख्येने माओवादी पोलीस जवानांवर हल्ला करुन घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याच्या गोपनिय माहितीवरुन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सि-६० (विशेष कृती दल) ची ०८ पथके आणि ए कंपनी ३७ बटा. सिआरपीएफचे पथक रविवार दिनांक १८/०५/२०२५ रोजी सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आले होते. काल दिनांक १९/०५/२०२५ रोजी सकाळी सि-६० पथके माओवादविरोधी अभियान राबवित असताना बिनागुंडा गावाला शिताफीने घेराबंदी करुन गावामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली असता, काही हिरवे-काळे गणवेश परिधान केलेले व काही साध्या वेशातील हत्यारासह असलेले संशयीत व्यक्ती पोलीस पथकावर घातपात करण्याची योजना आखत असल्याचे दिसून आले. गावामध्ये सामान्य नागरिक देखील असल्याने पोलीस पथकाने गोळीबार न करता अंत्यंत शिताफीने पाच माओवाद्यांना त्यांच्याकडील हत्यारासह ताब्यात घेतले. यावेळी इतर माओवादी गावाचा व जंगल परिसराचा फायदा घेत त्या ठिकाणावरुन पळून जाण्यास यशस्वी झाले. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या माओवाद्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले असता, सदर इसमांची नावे १) उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम, प्लाटुन क्रमांक ३२), वय २८ वर्षे, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.) २) पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम, प्लाटुन क्रमांक ३२), वय १९ वर्षे रा. कोंचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर (छ.ग.), ३) देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य, प्लाटुन क्रमांक ३२), वय १९ वर्षे रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.) व इतर दोन जहाल माओवादी सदस्य असे असल्याचे उघड झाले. अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की, सदर पाचही इसम हे सक्रिय जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते बिनागुंडा जंगल परिसरात दाखल झाले होते. यावेळी अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांकडून ०१ एसएलआर रायफल, ०१ ३०३ रायफल, ०३ सिंगल शॉट रायफल, ०२ भरमार बंदुका, ०३ वॉकीटॉकी व ईतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर पाचही माओवाद्यांपैकी १) उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम, प्लाटुन क्रमांक ३२), वय २८ वर्षे, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.) २) पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम, प्लाटुन क्रमांक ३२), वय १९ वर्षे रा. कोचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर (छ.ग.), ३) देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य, प्लाटुन क्रमांक ३२), वय १९ वर्षे रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.) यांना आज दिनांक २०/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली असून इतर दोन माओवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करुन पुढील कार्यवाहीची तजवीज ठेवण्यात आली आहे. पोलीसांच्या अभिलेखावर दाखल गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याबाबत पडताळणी सुरु आहे.

> शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

१) महाराष्ट्र शासनाने उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम, प्लाटुन क्र. ३२) हिच्यावर १६ लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.

२) महाराष्ट्र शासनाने पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम, प्लाटुन क्र. ३२) हिच्यावर ०८ लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.

३) महाराष्ट्र शासनाने देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य, प्लाटुन क्र. ३२) हिच्यावर ०४ लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.

४) इतर दोन माओवादी सदस्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे एकुण ०८ लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.

सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांडंट ३७ बटा. सिआरपीएफ, श्री. दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.