५२ ताश पत्त्यांवर जुगार खेळणारे एकुण ११ इसमांवर गुन्हा दाखल नगद, मोबाईल, मोटार सायकलसह ३,१९,६५०/- रु.ची मालमत्ता जप्त
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कारवाई …
दिनांक १८/०५/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत मौजा चक वाघाई तलाव जंगल परिसरात छापा टाकला असता सदर ठिकाणी एकुण ११ इसम ५२ ताश पत्त्यांवर जुगार खेळत असतांना मिळुन आल्याने त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचे अंग झडतीत व जुगाराच्या डावावर तसेच मोबाईल व तीन मोटार सायकल असा एकुण ३,१९,६५०/- रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आला आहे.
जुगार खेळणारे ११ इसमांविरुध्द पोलीस स्टेशन भिसी येथे अपराध क्रमांक ६७/२०२५ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सुनिल गौरकार, पोहवा नितीन कुरेवार, नितीन साळवे, जय सिंह, गणेश मोहुर्ले, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं. गणेश भोयर, गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.