सिंदेवाही तालुक्यात बिबट्या चे आतंक कायम ! तब्बल दहा शेळ्या केल्या ठार
सिंदेवाही – लाडबोरी आज मध्यरात्री दरम्यान बिबट वाघाने गोठ्यात प्रवेश करीत तब्बल दहा शेळ्याच्या फडशा पाडला आहे, मौजा लाडबोरी येथील श्रावण हरबा चौके, हे शेती ला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन करीत होते, त्यांच्या कडे एकूण गाभण शेळ्या 3 नग, बकरे 3 नग, मोठ्या शेळ्या 4 नग,असे एकूण 10 नग होते, रोजच्या प्रमाणे शेळ्या चारायला घेऊन जायचे व सायंकाळी घरी आणून गोठ्यात बांधून ठेवायचे असा रोजचा क्रम होता, घर गावाच्या शेवटी असल्याने घरा सभोवताल कुंपण सुद्धा केले होते, परंतु 30 तारखेच्या रात्री ग्रामपंचायत विद्युत खांबावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने पूर्ण अंधार होता त्यामुळे मध्यरात्री बिबटया ने गावात प्रवेश करून दहा शेळ्या ठार केले, सकाळी श्रावण चौके हे आपल्या शेळ्या बघण्यासाठी शेळ्या च्या गोठ्याकडे आले तेव्हा संपूर्ण शेळ्या मृत अवस्थेत बघून त्यांना धक्का च बसला, मृत शेळ्या ची बातमी गावभर पसरताच गावातील नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली, सदर घटनेची माहिती वनविभाग ला देण्यात आली, सिंदेवाही वनपारिक्षेत्र चे वनपारिक्षेत्र अधिकारी ( प्रादे ) विशाल सालकर, नीतीन गडपायले, क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही, आर जवळे वनरक्षक कच्चेपार 1 यांनी घटना स्थळी पोहचून संपूर्ण मृत शेळ्याचा पंचनामा केला आहे, सदर घटनेत दीड लाख रुपयाची नुकसान झाली असल्याचे अंदाज लावण्यात येत आहे.