बेला ग्रामपंचायत ठरले देशात अग्रेसर कार्बन न्युट्रल व्हीलेज म्हणून देशात प्रथम

बेला ग्रामपंचायत ठरले देशात अग्रेसर कार्बन न्युट्रल व्हीलेज म्हणून देशात प्रथम

भंडारा,दि.13 : राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हयातील बेला ग्रामपंचायतीची देशात प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे, महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते भंडारा जिल्हयातील भंडारा तालुका अंतर्गत येणा-या ग्रामपंचायत बेला यांना दिनांक 11/12/2024 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पंचायत्त पुरस्कार अंतर्गत “Carbon neutral village” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कारात सन्मान‌चिन्ह, प्रमाणपत्र व एक कोटी रूपये रकमेचे धनादेशाचा समावेश आहे. पंचायतीचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या पंचायत राज विभागाचे वतीने नऊ संकल्पनेचा अवलंब केला आहे. या नऊ संकल्पना प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी गतवर्षीपासून पंचायत राज संस्थांसाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सुरू केला आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांतर्गत तीन विशेष श्रेणीचे पुरस्कार असून त्यामध्ये”Carbon neutral village” पुरस्कार अंतर्भूत आहे.

नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम राजीव रंजन सिंह पंचायती राज मंत्री भारत सरकार, एस. पी. सिंह बघेल राज्य मंत्री पंचायत राज विभाग भारत सरकार यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करून महामहीम, राष्ट्राती भारत सरकार यांचे शुभहस्ते बेला ग्रामपंचायतोंस सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळयात सरपंच सौ. शारदा गायथने, उपसरपंच सौ. अर्चना कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी विलास खोब्रागडे, भंडारा पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्रीमती डॉ. संघमित्रा फोल्हे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) उमेश नंदागवळी उपस्थित होते.

बेला हे गाव भंडारा शहरा लगत असून शहरातील प्रदुषित हवेपासून गावातील बातावरणातील उत्सर्जित होणारा दुषित कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेऊन गावातील वातावरण शुग्द कसे करता येईल यावर केलेले प्रयत्न व उपाययोजना यासाठी बेला ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बेला ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. शारदा गायधने, उपसरपंच सौ. अर्चना कांबळे व ग्रामपंचायत अधिकारी विलास खोब्रागडे ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील सन्माननीय पदाधिकारी, महिला, निवृत्त कर्मचारी, शालेय विद्यार्थी यांची मदत घेऊन विशेष ग्रामसभा, महिला ग्रामसभा, कार्यशाळा घेऊन सदर बाबीची प्रचार व प्रसिध्दी करून गावात असणारे कार्बन उत्सर्जनाच्या स्त्रोतावर नियंत्रण ठेऊन भंडारा जिल्हयाचा मान देशात उंचावलेला आहे. सोलर एनर्जी, घन कच-यापासून सेंद्रीय खत बनविणे यासारखे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावातील कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यात यश प्राप्त केले आहे.

“Carbon neutral village” पुरस्कार प्राप्त होण्यासाठी बेला ग्रामपंचायत्तीस पंचायत समिती भंडारा चे गट विकास अधिकारी श्रीमती डॉ.संघमित्रा कोल्हे व विस्तार अधिकारी (पंचा.)प्रमोद हुमने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हास्तरावरून मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, भा.प्र.से. तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) उमेश नंदागवळी यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली बेला ग्रामपंचायतीने सदर पुरस्कार प्राप्त केला.