मागील १५ दिवसापासून चिमूर येथील बेपत्ता महिलेच्या हत्येची घटना उघड… खुनाचा गुन्हा दाखल

मागील १५ दिवसापासून चिमूर येथील बेपत्ता महिलेच्या हत्येची घटना उघड… खुनाचा गुन्हा दाखल

पोलीस स्टेशन चिमूर ह‌द्दीतील देवांश जनरल स्टोअर्स दुकानदार ३७ वर्षीय विवाहित महिला नामे सौ. अरुणा अभय काकडे हया दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी नागपूर येथील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील सामान खरेदी करण्याकरीता जावून नागपूर येथून बेपत्ता झाल्याने पो.स्टे. चिमुर येथे तिची हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

सदर हरविल्याची तक्रारी संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील सपोनि श्री बलराम झाडोकर यांनी तांत्रिक तपास करुन प्रकरण उघडकीस आणले. सदर प्रकरणी आरोपी नामे नरेश पांडुरंग डाहुले याने सदर बेपत्ता महिला अरुणा अभय काकडे हिला नागपूर येथे जिवानिशी ठार करुन तिचे प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे.

यातील बेपत्ता महिला अरुणा अभय काकडे हिचा शोधासाठी सपोनि श्री बलराम झाडोकर यांनी स्वतःहून सातत्याने अतिपरिश्रम घेवुन केलेल्या कौशल्यपूर्ण तपास कार्यप्रणालीमुळे सदर गंभीर संवेदनशील प्रकरण उघडकीस आल्याने मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी सपोनि श्री बलराम झाडोकर व पथकास रुपये ३५,०००/- रोख बक्षिस देण्याचे जाहीर केले असुन यापुढे चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतःहून अशा प्रकारे स्वतः दखल घेवुन प्रकरणे उघडकीस आणल्यास त्यांना सुध्दा अशाच प्रकारे रोख बक्षिस देवून प्रोत्साहित करण्यात येईल असे आवाहन केले आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन चिमूर येथे कलम १०३, १३७, १४० (१), २३८ भारतीय न्याय संहिता – २०२३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा करीत आहेत.