डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या विहीर अनुदानात वाढ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या विहीर अनुदानात वाढ

कृषि विभाग जिल्हा परीषद गडचिरोली मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतक-याकरीता ही योजना असून त्यांना या योजनेअंतर्गत सिंचन सुविधा व औजारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी समाजकल्याण विभाग व आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. दिनांक 3/12/2024 चे कृषि आयुक्तालयाचे मार्गदर्शक सुचनानुसार सन 2024-25 या वर्षापासून सिंचन विहीरीकरीता रूपये 400000, जुनी विहीर दुरूस्तीकरीता रूपये 100000, इनवेल बोअर करीता रूपये 40000, विद्यूत जोडणीकरीता रूपये 20000, पंपसंच करीता खर्चाच्या 90 टक्के किंवा रूपये 40000 ,सौर कृषि पंपाकरीता खर्चाच्या 90 टक्के किंवा 30000 पर्यंत, तुषार सुक्ष्म सिंचनाकरीता 15 टक्के किंवा रूपये 47000 मर्यादेत , ठिबक सिंचन संचाकरीता 15 टक्के किंवा रूपये 97000 मर्यादेत पुरक अनुदान,शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण खर्चाच्या 90 टक्के किंवा 200000 पर्यंत ,एचडीपीई/ पीव्हीसी पाईप खर्चाच्या 100 टक्के किंवा 50000 पर्यंत,बैलचलित/ ट्रक्टरचलित औजारे- यंत्रसामुग्री रूपये 50000 व परसबाग- बियाणे/कलमे/रोपे/खते/औषधे करीता रूपये-5000 अनुदान मिळणार आहे. या योजनेकरीता महाडिबीटी पोर्टलचे mahadbt.maharashtra.gov.in /farmer/login/login या संकेतस्थळावर शेतक-यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनु. जाती, नवबौध्द व आदिवासी शेतकरी असावा. त्याच्याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे जमीनधारणेचा 7/12 असावा. लाभार्थ्याकडे स्वताचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे स्वताचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतक-याकडे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर एवढी शेतजमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीव्दारे करण्यात येणार असून अनुदान अदा करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईनच होणार आहे.योजनेच्या सविस्तर माहीतीकरीता पंचायत समितीच्या कृषि अधिका-याशी संपर्क करावा , असे आवाहन जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कृषि विकास अधिकारी कु. किरण खेामणे व प्रदिप तुमसरे जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) यांनी केले आहे.