23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पुर्व परिक्षेचे आयोजन आदिवासी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे.

23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पुर्व परिक्षेचे आयोजन

आदिवासी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे.

भंडारा,दि.04 : नागपुर विभागातील एकलव्य रेसिडेंशियल स्कुल खैरी परसोडा, बोरगाव बाजार, चामोर्शी, गेवर्धा (भाकरोंडी), अहेरी, देवाडा, कोरची, भामरागड, एटापल्ली (कसनसुर), धानोरा (सावरगाव) येथे सत्र 2025-26 मध्ये इयत्ता 6 वी वर्गात नविन प्रवेश व इयत्ता 7 वी ते इयत्ता 9 वीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या रिक्त जागा भरणे करिता दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पुर्व परिक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभागी होउुन लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, निरज मोरे यांनी केले आहे. या परीक्षा ही भंडारा व साकोली येथे तालुका स्तरावर आयोजीत केली जाईल परीक्षे करीता वर्ग निहाय पात्रता खालील प्रमाणेआहे.

अ.क्र प्रवेश घ्यावयाची इयत्ता

गुण व गुण पत्रीकाची आवश्यकता (शैक्षणिक वर्ष-2024-25)

1

इयत्ता 6 वी

इयत्ता 5 वी द्वितीय सत्र

2 इयत्ता 7 वी

इयत्ता 6 वी द्वितीय सत्र

3 इयत्ता 8 वी

इयत्ता 7 वी द्वितीय सत्र

4 इयत्ता 9 वी इयत्ता 8 वी द्वितीय सत्र

आवेदनांत वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे एकुण प्राप्त गुणांची परिपुर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. कोणत्याही स्थितीत श्रेणी पध्दती स्विकृत केली जाणार नाही याची नोद घ्यावी. शैक्षणिक वर्ष 2024-25 या सत्रातील द्वितीय सत्राच्या एकुण्गुणांची गुण पत्रिका जोडुन सर्व विद्यार्थ्यांनी /पालकांनी तसेच मुख्याध्यापक यांनी दिनांक 05 फेब्रुवारी 2025 पुर्वी परिपुर्ण आवेदन अर्ज भरणे आवश्यक आहे. दिनांक 05 फेब्रुवारी 2025 नंतर प्राप्त होणारे आवेदन अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

पात्रता व अटी खालील प्रमाणे असतील

1. विद्यार्थी अनुसूचित जमातीचे (आदिवासी) असावा सक्षम अधिकारी यांचे कडुन प्राप्त जातीचा दाखला जोडावा .(उपविभागीय अधिकारी महसुल)

2. पालकाचे सरासरी एकत्रित वार्षिक उत्पन्न 6,00,000/- (सहालक्ष) रूचे आत असावे

3. प्रवेश अर्जा सोबत बोनाफॉईड सट्री फिकेट जोडने आवश्यक आहे.

4. प्रवेश घेण्या पुर्वी पालकांना या कार्यालयात प्रवेशा बाबतचे संमती लिहुण द्यावे लागेल.

5. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड

6. पालंकाचा रहिवासी दाखला, दरिद्रय रेषेखली असल्यास तसा दाखला विधवा असल्यास तसा दाखला सोबत जोडावा.

प्रवेश अर्ज खालील ठिकाणी नि: शुल्क उपलब्ध आहेत.

1. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल,भंडारा

2. गट शिक्षणाधिकारी, पंचात समिती भंडारा,तुमसर मोहाडी,पवनी,लाखांदुर,लाखनी,साकोली

3. मुख्याध्यापक,शासकीय आश्रम शाळा, खापा अनुदनित आश्रम शाळा माडगी, आमगाव (आदर्श),कोका,येरली, चांदपुर पवनारखारी

अधिक माहिती करीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा कार्यालयात साधावा.असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभागानी कळविले आहे.