जागतिक एडस दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

जागतिक एडस दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

भंडारा,दि.29 : महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी,मुंबई यांचेकडून 1 डिसेंबर,2024 जागतिक एडस दिनानिमित्य जिल्हयामध्ये विविध उपक्रम राबवून एचआयव्ही/एडसविषयी युवक तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचून तपासणीसाठी प्रोत्साहित करावयाचे असून जनजागृती करावयाची असून आहे.त्याअनुषंगाने जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष डापकू जिल्हा रुग्णालय,भंडाराद्वारे 2 डिसेंबर,2024 ला सकाळी 10.30 वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यानीकरीता रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या रॅलीस अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय,भंडारा यांचेद्वारे शपथ वाचन करुन हिरवी झेंडी दाखवून सदर रॅली जिल्हा रुग्णालय मधून बस स्टॉप-पोस्ट कार्यालय-मोठा बाजार-परत जिल्हा रुग्णालय,भंडारा येथे रॅलीची सांगता करण्यात येईल.

यावर्षीची एड्स दिनाची थिम Take the Rights Path, मार्ग हक्काचा,सन्मानाचा अशी आहे.एआरटी केंद्र,जिल्हा रुग्णालय येथील नोंदणीकृत 11 ते 18 वर्षे वयोगटातील सिएलएचआयव्ही मुले व मुली यांचेकरीता रांगोळी किंवा चित्रकला स्पर्धेचे आयोजन एआरटी केंद्र,जिल्हा रुग्णालय,भंडारा येथे 6 डिसेंबर,2024 ला सकाळी 11.30 वाजता आयोजित केलेले असून स्पर्धेमधील विजयी स्पर्धेकांना रोख बक्षिस प्रथम रु.1500/ द्वितीय रु.1000/- तृतीय रु.500/- चे बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येईल.

सोशल मिडिया पोस्ट मेकिंग स्पर्धेचे आयोजन खालील विषयावर करावयाचे आहे. मातेपासून तिच्या होणाऱ्या बाळास एचआयव्ही/एडस पासून संरक्षण व एचआयव्ही/एडस संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधात्मक उपाय तसेच एचआयव्ही/एडस प्रतिबंध व नियंत्रण कायदा-2017 व एचआयव्ही/एडस जनजागृती टोल फ्री क्रमांक -1097 व मादक द्रव्याचे सेवन व त्याचे दुष्परिणाम करिता स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व स्पर्धेकांनी तयार केलेले पोस्ट/साहित्य dpobhandara@mahasacs.org ई-मेल किंवा 9860277604 किंवा व्हॉटसॲपवर तयार केलेले स्पर्धेची पोस्ट साहित्य पाठवितांनी त्यावर स्पर्धेकांचे नाव महाविद्यालयाचे नांव व वर्ग,संपर्क क्रमांक व दिनांक 8 डिसेंबर,2024 पर्यत सादर करावेत यानंतर आलेले पोस्ट/साहित्य विचारात घेतले जाणार नाही.

तसेच तालुकास्तरावर आयसीटीसी समुपदेशक/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचेद्वारे जागतिक एडस दिनानिमित्त महाविद्यालयीन स्तरावर 2 ते 9 डिसेंबर,2024 पर्यत एचआयव्ही एडस क्षयरोग, एसटीआय/ आरटीआय, ए. आर. टी औषधोपचार याविषय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.असे जिल्हा शल्यचिकित्सक श्री.सोयाम जिल्हा रुग्णालय,भंडारा विभागानी कळविले आहे.