क्रीडा प्राविण्य प्राप्त मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप
भंडारा,दि.29 : जिल्हा परिषद भंडारा, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने भंडारा जिल्हयातील विविध खेळांत राज्य-राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य प्राप्त मुलांचा गुणगौरव सोहळा कमलाकर रणदिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक),राजेंद्र रुद्राकार, ज्येष्ठ अधिव्याख्याता,डायट, भंडारा मंगला गोतारणे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यात कु. सानवी महाजन, जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय, सिहोरा पंचायत समिती, तुमसर राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त वेदांत बाळासाहेब मुंडे ऑल इंडिया साई चम्पियनशिप तलवारबाजी स्पर्धेत संपूर्ण भारतातून व्दितीय क्रमांक प्राप्त तथा लाल बहाददूर शास्त्री कनिष्ठ महाविदयालय, भंडारा येथिल 19 वर्ष मुलांच्या वयोगटात नेटबॉल स्पर्धेत राज्यस्तरिय प्रथम क्रमांक प्राप्त करुन सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला संघाचा समावेश होता.
या नेटबॉल संघात यश खिलोटे (कर्णधार), दिव्यां नंदनवार (उपकर्णधार), सागर किरपान, आयुष ठवकर, तुषार खांदाडे, तन्मय कावळे, वेदांत चकान, वेदांत कांबळे, सुभम कळंबे, कृणाल कुरंजेकर, नेहाल तरारे, यश बिबिनहाडे, क्रीडा निर्देशक विशांत टेंभूरकर यांना भेटवस्तू व चषक देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंदप्रमुख यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र माडेमवार, हरिकिशन अंबादे, लता धकाते, देवानंद घरत, मनोज धावडे यांनी परिश्रम घेतले.