जिल्हाधिकारी कार्यालयात 2 डिसेंबर रोजी लोकशाही दिन
भंडारा, दि. 27: शासन परिपत्रक दिनांक 26 सप्टेंबर,2022 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे प्रत्येक महिन्याचे पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.
तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुक,2024 ची आचारसंहिता लागु असल्याने माहे नोव्हेंबर,2024 चे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आले नव्हते.तथापी विधानसभेची आचारसंहिता संपुष्टात आलेली असल्याने दिनांक 2 डिसेंबर,2024 रोजी सोमवारी दुपारी 1.00 वाजता कार्यालय परिषद कक्ष येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आले आहे.लोकशाही दिनाच्या 15 दिवसाआधी जनतेच्या तक्रार/अर्ज संकीर्ण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे न्यायप्रविष्ट प्रकरणे,राजस्व/अपील प्रकरणे, सेवाविषयक ,आस्थापना विषयक,सामुहिक कामासंबंधीत तसेच तालुका लोकशाही दिनी सादर न केलेले तक्रार/ अर्ज स्विकारले जाणार नाही. दोन प्रतीत स्विकारण्यात येतील. असे निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.