पुरुष नसबंदी विषयी जनजागृती कार्यक्रम
भंडारा, दि.27 : कुटुंब नियोजन हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे धोरण आहे. मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असून सुद्धा अद्यापही कुटुंब नियोजनाची जबाबदारी बऱ्याचदा स्त्रियांनाच पार पाडावी लागते. समाजात असलेले गैरसमज व भीतीपोटी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष तयार होत नाही. कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागाला चालना देण्यासाठी तसेच पुरुष नसबंदी पद्धती जसे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, निरोधचा वापर यांचे प्रमाण वाढविण्याच्या हेतूने पुरुष नसबंदी पंधरवाडा संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे.
सदरील पंधरवाड्यामध्ये पुरुष नसबंदी विषयी जनजागृती करणे, लोकांना पुरुष नसबंदीचे महत्तव पटवून देणे, महिलांप्रमाणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी हि पुरुषाची सुद्धा आहे याविषयी माहिती देऊन समुपदेशन करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असून कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अधिक प्रयत्नशील व बळकट करण्यासाठी यावर्षी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा 2024 राबविण्यात येत आहे. सदर पंधरवाडा 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत असून सदरील मोहिमेचे घोषवाक्य ” आजच सुरुवात करूया पती-पत्नी मिळून कुटुंब नियोजनावर बोलूया ” हे आहे.
या मोहिमेची तयारी करण्यात आली असून व्यापक प्रसिद्धी व्हावी जेणेकरून पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची गुणवत्ता पूर्ण व खात्रीशीर सेवा लाभार्थ्यांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुरुष नसबंदी पंधरवडा साजरा केल्याने पुरुष शस्त्रक्रिये बाबत समाजात जनजागृती होईल तसेच यापूर्वी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे ,अशा लाभार्थी मार्फत मोहिमेचा प्रचार व प्रसार करून माहिती दिल्याने पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढविण्यास निश्चितच मदत होईल.
आजघडीला भंडारा जिल्ह्यातील प्रा.आ.केंद्र,ग्रामीण रुग्णालय,जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी पुरुष व स्त्री शस्त्रक्रियेची सेवा उपलब्ध आहे. जिल्ह्याला कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट ५७८० असून माहे एप्रिल २०२४ पासून ऑक्टोम्बर पर्यंत १७१० कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यामध्ये १४५७ महिला व फक्त २५३ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांनी सदर पंधरवाडा यशस्वीपणे राबविण्याचे आव्हान केले असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पंधरवड्याचे वेळोवेळी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्री शस्त्रक्रियेपेक्षा खूपच सोपी असून,यासाठी ऍडमिट होण्याची सुद्धा आवश्यकता नाही.दहा मिनटात शस्त्रक्रिया करून लगेच सुट्टी दिली जाते.यासाठी शासनाकडून १,१०० रुपये मानधन दिले जाते.महिलांवर इतर अनेक जबाबदारी असल्याने अधिकाधिक पुरुषांनी नसबंदीसाठी पुढे यावे.पुरुष नसबंदी मुले शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही – डॉ.मिलिंद सोमकुंवर,जिल्हा आरोग्य अधिकारी भंडाराकुटुंब नियोजनाचे ओझे महिलावरच
समाजात असलेले गैरसमज व भीतीपोटी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष तयार होत नाही पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्री शस्त्रक्रियेपेक्षा खूपच सोपी असून,यासाठी ऍडमिट होण्याची सुद्धा आवश्यकता नाही.दहा मिनटात शस्त्रक्रिया करून लगेच सुट्टी दिली जाते.यासाठी शासनाकडून १,१०० रुपये मानधन दिले जाते.महिलांवर इतर अनेक जबाबदारी असल्याने अधिकाधिक पुरुषांनी नसबंदीसाठी पुढे यावे.पुरुष नसबंदी मुले शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही – डॉ.मिलिंद सोमकुंवर,जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा