सीसीटीव्हीबाबत मोफत प्रशिक्षण २५ नोव्हेंबरपासून

सीसीटीव्हीबाबत मोफत प्रशिक्षण २५ नोव्हेंबरपासून

भंडारा, दि. 21 : भारत सरकार, महाराष्ट्र शासन एवं बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा संस्थेद्वारा निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पासून इन्स्टॉलेशन आणि सर्विसिंग ऑफ सीसीटीव्ही कॅमेरा, सेक्युरिटी अलार्म आणि स्मोक डिटेक्टर चे 13 दिवसीय प्रशिक्षण सुरु होत आहे.

प्रशिक्षणामध्ये मूलभूत बाबी आणि इन्स्टॉलेशन ऑफ सीसीटीव्ही कॅमेरा याबाबतीतील विविध तसेच ऍडव्हान्स फीचर्स ऑफ सीसीटीव्ही, ऑटो स्कॅन, बॅक लाईट कंपनसेशन, आयसीआर, डिजिटल झूम, फोकस मोड, आयरिस मोड, व्हाईट बॅलेन्स मोड, ऑटोक्रुझ, ऑन स्क्रीन डिस्प्ले, ऑटो एक्सपोजर, स्पेशल फंक्शन्स, मोशन डिटेक्शन, मेंटेनन्स ऑफ सीसीटीव्ही कॅमेरा, स्मोक डिटेक्टर, कमर्शियल स्मोक डिटेक्टर कॉन्व्हेंशनल आणि ऍड्रेसिबल, सेन्सर टाइप्स, अल्ट्रासोनिक डिटेक्टर्स, इन्फ्रारेड डिटेक्टर, मायक्रोवेव्ह डिटेक्टर, फोटो इलेक्ट्रिक बिम्स, ग्लास ब्रेक डिटेक्शन, सीसीटीव्ही वीज-सुरक्षा उपाय, इत्यादी. प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना जेवण, चाय, नास्ता, वही, पुस्तके व राहण्याची आदी सोय मोफत केली जाईल. स्वयं रोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय 18 ते 45 वर्षे, शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा पुरुष मंडळीनी मुलाखती करिता 25 नोव्हेंबर 2024 सकाळी 10 वाजता बी. ओ. आय. स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था लालबहादूर शात्री (मनरो)

शाळेच्या बाजूला शात्री चौक भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेचे निर्देशक मिलिंद इंगळे सर यांनी केले आहे.

अधिकच्या माहिती करिता संपर्क क्र. 9511875908, 8669028433, 9766522984, 8421474839