निवृत्तीवेतनधारकांची आयकर कपात नवीन करप्रणालीनुसार जुन्या करप्रणालीसाठी 20 ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याची मुदत

निवृत्तीवेतनधारकांची आयकर कपात नवीन करप्रणालीनुसार जुन्या करप्रणालीसाठी 20 ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याची मुदत

आर्थीक वर्ष सन 2024-2025 करीता माहे ऑक्टोबर 2024 चे निवृत्तीवेतनापासुन आयकर बसत असलेल्या निव वृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतनातुन NEW TAX REGIME नुसार आयकराची कपात केली जाणार आहे.

ज्या निवृत्तीवेतनधारकांना OLD TAX REGIME नुसार आयकराची गणणा करावयाची आहे त्यांनी आयकरातुन सुट मिळण्याकरीता लागण-या आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली येथे 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत लेखी अर्ज करावा असे जिल्हा कोषागार अधिकारी, यांनी कळविले आहे.