लैंगिक छळ तक्रार समितीत अशासकीय सदस्याकरिता अर्ज आमंत्रीत

लैंगिक छळ तक्रार समितीत अशासकीय सदस्याकरिता अर्ज आमंत्रीत

गडचिरोली, दि.23: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समिती मध्ये अध्यक्ष आणि दोन अशासकीय सदस्यांची नेमणुक करावयाची आहे. अध्यक्ष आणि दोन अशासकीय सदस्य यांची पात्रता खालीलप्रमाणे असेल. समितीचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असेल. इच्छुक व्यक्तीनी दिनांक 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली, बॅरेक क्र.1 खोली क्र. 26 कॉम्पलेक्स परिसर गडचिरोली येथे अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक अनुभव आणि जात प्रमाणपत्र सादर करावे
अध्यक्ष :- सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयासाठी बांधील असलेल्या महिलांमधून अध्यक्षाची नियुक्ती करण्यात येईल
दोन अशासकीय सदस्य :- महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकीय संघटना / संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नाशी परिचित असलेली व्यक्ती यामधून दोन सदस्य नामनिर्देशित करायचे आहेत यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. तसेच किमान एका नामनिर्देशित सदस्य कायदेतज्ज्ञ व किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला असावी.